AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहेबांच्या अनुभवाच्या पेटाऱ्यातून ज्ञानमोती वेचले, पवारांच्या भेटीनंतर तेजस्वी यादव हरखले

शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यात तेजस्वी यादव यांनी भेट घेतली (Tejashwi Yadav Sharad Pawar)

साहेबांच्या अनुभवाच्या पेटाऱ्यातून ज्ञानमोती वेचले, पवारांच्या भेटीनंतर तेजस्वी यादव हरखले
तेजस्वी यादव दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला
| Updated on: Feb 10, 2021 | 1:09 PM
Share

नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणातील युवा चेहरा आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. विविध राजकीय विषयांवर गप्पा झाल्याची माहिती तेजस्वी यादव यांनी ट्विटरवरुन दिली. राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त राजधानी दिल्लीत आहेत. पवारांच्या दिल्ली दौऱ्यात तेजस्वी यादव यांनी भेट घेतल्याचे दिसत आहे. (RJD Leader Tejashwi Yadav meets Sharad Pawar)

“भारतीय राजकारणातील वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. विविध राजकीय विषय आणि मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कनवाळू नेते,  प्रेम आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेल्या शरद पवार यांनी आपल्या अनुभवाच्या पेटाऱ्यातून ज्ञानमोती वेचले” अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर पवारांसोबतच्या भेटीचा अनुभव कथित केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे तेजस्वींनी आभार व्यक्त केले आहेत.

तेजस्वी यादवांचं पवारांकडून कौतुक

तेजस्वी यादव यांना मोकळीक मिळण्यासाठी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवली नाही, असं शरद पवार यांनी निकालानंतर म्हटलं होतं. निवडणूक दोन घटकांमध्ये झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीशकुमार यांच्याकडे यंत्रणा होती. बदलाला हळूहळू वाट दिसत आहे. तेजस्वी यादव लढले ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील, अशा शब्दात शरद पवार यांनी स्तुतिसुमनं उधळली होती.

तेजस्वी यादव कोण आहेत? (Who is Tejashwi Yadav)

बिहारचे राजकारण कोळून प्यायलेल्या नितीशकुमार यांच्याशी कडवी झुंज दिल्याने राजद नेते तेजस्वी यादव राष्ट्रीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे चिरंजीव आहेत.

फक्त इयत्ता आठवीपर्यंत शिकलेले तेजस्वी यादव हे मूळचे क्रिकेटपटू आहेत. झारखंडमधून ते रणजी करंडकासाठी खेळले आहेत. शिवाय आयपीएलमध्ये ते दिल्ली डेअरडेविल्सकडून ते खेळले आहेत.

क्रिकेटच्या पीचवरही तेजस्वी चमक

क्रिकेटमध्ये आलेले अपयश आणि लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात जावं लागल्याने तेजस्वी यांना बिहारच्या राजकारणाच्या पिचवर उतरावं लागलं. त्यांचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. 2010मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला. त्यानंतर 2013 मध्ये लालूप्रसाद यांना अटक झाल्यामुळे तेजस्वींकडे पक्षाची धुरा गेली. राजकारणात आल्यानंतरही केवळ वयाची पंचविशी गाठलेली नसल्याने त्यांना 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती.

मात्र, 2015 मध्ये राघोपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. राजदच्या पाठिंब्याने बनलेल्या नितीशकुमार सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते. मात्र, एका घोटाळ्यात तेजस्वी यांचं नाव आल्यानंतर नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून भाजपची साथ धरल्याने त्यांचं उपमुख्यमंत्रिपद अल्पजीवी ठरलं.

सध्या लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत. त्यांच्या गैरहजेरीत तेजस्वी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी सर्वाधिक 251 प्रचारसभा घेऊन प्रचाराचं रान उठवलं होतं. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी तेजस्वी यादव बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचे सर्वात तरुण उमेदवार ठरले होते. मात्र तरुण मुख्यमंत्री हा मान मिळवण्याचं त्यांचं स्वप्न तूर्तास होल्डवर गेलंय.

संबंधित बातम्या 

तडफदार भाषणानंतर अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, पी. चिदंबरम, सुप्रिया सुळेही उपस्थित!

गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात पवार अपयशी ठरतात तेव्हा; शरद पवारांनीच ऐकवला संसदेत किस्सा

(RJD Leader Tejashwi Yadav meets Sharad Pawar)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.