AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियमांचं पालन करणं अहंकार आहे का, राज्यपालांनी अधुनमधून गोवा सरकारचं विमानही वापरावं: राऊत

ज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात. | Bhagatsingh Koshyari

नियमांचं पालन करणं अहंकार आहे का, राज्यपालांनी अधुनमधून गोवा सरकारचं विमानही वापरावं: राऊत
संजय राऊत
| Updated on: Feb 11, 2021 | 2:39 PM
Share

नवी दिल्ली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari ) हे खासगी कामासाठी उत्तराखंडला जाणार होते. त्यामुळे नियमानुसार त्यांना सरकारी विमान नाकारण्यात आले. सरकारने राज्यघटनेतील नियमांचं पालन करणे, हा अहंकार आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Maharashtra govt deneid plane to governor bhagat singh koshyari according to rules)

ते गुरुवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राज्यपालांना विमान नाकारल्यामुळे निर्माण झालेल्या वादासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले. राज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात.

मात्र, व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियम आहे. एरवी राज्यपालांना महाराष्ट्र सरकारकडून हेलिकॉप्टर आणि विमान कायम उपलब्ध करुन दिले जाते. पण यावेळी तांत्रिक अडचणींमुळे तसे करता आले नाही. भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचे विमान वापरावे, थोडा फार त्यांच्यावरही टाकावा, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

इतरांना अहंकारी बोलणे फडणवीसांना शोभत नाही: संजय राऊत

राज्यपालांना विमान नाकारल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला अहंकारी म्हटले होते. याविषयी विचारणा केली असता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली. ‘अरे बापरे.. अहंकार हा शब्द कोण कोणाला उद्देशून म्हणतंय’, अशी खोचक टिप्पणी केली. या संपूर्ण प्रकरणात अहंकाराचा प्रश्न येत नाही. कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकार ज्याप्रकारे वागतंय ते नियमात बसत असेल तर केवळ राज्यपालांना विमान नाकारणं, हे अहंकार कसा होऊ शकतो, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

… मग राज्यपालांनी कायम राजभवनातच राहायला हवं

कोरोनाचा धोका असल्यामुळे आपण सरकारी विमानाने प्रवास करण्याचे ठरवले, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. मात्र, खासगी विमानात कोरोनाचा धोका नाही, असे कोणी सांगितले आहे का? राज्यपालांना कोरोनाची भीती वाटत असेल तर त्यांचं वय पाहता त्यांनी राजभवनातच राहिलं पाहिजे.

आम्ही राज्यपालांचा पूर्णपणे आदर करतो. आता ते सरकारचा किती आदर करतात ते माहिती नाही. राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्त्या करत नसतील तर तो राज्यघटनेचा अपमान आहे. सध्या राजभवनात भाजपचे पक्षकार्य चालते, असे लोकांचे म्हणणे आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मनात राज्यपालांबद्दल आदर आहे. त्यांनी राज्यपालांचा अपमान केलेला नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

राज्यपाल प्रकरणी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज चढतो!

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‘स्पाईसजेट’ने उत्तराखंडला रवाना

(Maharashtra govt deneid plane to governor bhagat singh koshyari according to rules)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.