AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द

आठवड्याला फक्त पाचच दिवस काम करावं लागत असूनही कर्मचारी कुचराई करत असल्याचं वर्षभरातच जाणवलं, त्यामुळे सिक्कीम सरकारने तातडीने हा निर्णय रद्द केला. Five Days Week cancelled

'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द
नोकरी बदलल्यास आता पीएफप्रमाणे ग्रॅज्युएटीही होणार ट्रान्सफर
| Updated on: Mar 11, 2020 | 9:47 AM
Share

गंगटोक : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय रद्द केला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी घेतलेला निर्णय तमंग सरकारने मागे घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्यात येईल. (Sikkim Government Employees Five Days Week cancelled)

‘सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा’ सत्तेत आल्यानंतर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अन्य सरकारी आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

आठवड्याला फक्त पाचच दिवस काम करावं लागत असूनही कर्मचारी कुचराई करत असल्याचं वर्षभरातच तमंग सरकारला जाणवलं, त्यामुळे तातडीने हा निर्णय रद्द करण्यात आला. एक एप्रिलपासून होणारी अंमलबजावणी ‘एप्रिल फूल’ ठरावी, अशी प्रार्थना आता सिक्कीम सरकारमधील कर्मचारी करत आहेत.

असं का झालं?

गेल्या वर्षभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी समाधानकारक कामगिरी केली नाही, कार्यप्रणालीत अपेक्षित बदल झाला नाही, शनिवार-रविवार सुट्टी मिळूनही अन्य दिवशी काम सुधारलं नाही, असं लक्षात आल्यामुळे सिक्कीम सरकारने निर्णय मागे घेतला.

हेही वाचा ‘त्या’ विभागांना 5 दिवसांचा आठवडा नाही, शासन निर्णय जारी!

महाराष्ट्रातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत केला होता. त्यानुसार 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी गेली अनेक वर्षे सरकारी कर्मचारी करत होते.

प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार

आतापर्यंत कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 288 व्हायचे. भोजनाचा 30 मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन 7 तास 15 मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यातील कामाचे तास 174 तर एका वर्षातील कामाचे तास 2088 इतके होत असत.

पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र, कामाचे 8 तास होतील. एका महिन्यातील कामाचे तास 176 तर वर्षातील कामाचे तास 2112 इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे, प्रतिमहिना 2 तास आणि प्रतिवर्ष 24 तास इतके कामाचे तास वाढतील.

Five Days Week cancelled

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.