Pulwama Encounter : गेल्या तीन दिवसांत काश्मीर खोऱ्यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा, पुलवामाच्या पाहुमधील चकमकीत आज तीन दहशतवादी ठार

श्रीनगर : पुलवामाच्या (Pulwama) पहू भागात रविवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या चकमक सुरू आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पहू (Pahu) भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याप्रमाणे सुरक्षा दलांनी पाहू भागता घेराबंदी करत शोध मोहीम सुरू केली. […]

Pulwama Encounter : गेल्या तीन दिवसांत काश्मीर खोऱ्यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा, पुलवामाच्या पाहुमधील चकमकीत आज तीन दहशतवादी ठार
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Apr 24, 2022 | 6:43 PM

श्रीनगर : पुलवामाच्या (Pulwama) पहू भागात रविवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या चकमक सुरू आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पहू (Pahu) भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याप्रमाणे सुरक्षा दलांनी पाहू भागता घेराबंदी करत शोध मोहीम सुरू केली. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी गोळीबार केला. ज्यात जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच येथे अजून दहशतवादी लपले असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे इतरांचा शोध सुरू असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले.

सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला

पोलिसांनी सांगितले की, पुलवामा जिल्ह्यातील पहू भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. कडेकोट बंदोबस्त पाहताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. मात्र, सुरक्षा दलांनी संयम राखत दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. वारंवार आवाहन करूनही दहशतवाद्यांनी त्याचे पालन केले नाही आणि त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले.

मिरहामा परिसरात चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान कुलगाम जिल्ह्यातील मिरहामा परिसरात झालेल्या चकमकीत एलईटीच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. सध्या येथे कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दोन दहशतवादी ठार

याआधी शनिवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. तीन दिवसांत खोऱ्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून दोन एके-47, सात मॅगझिन, नऊ ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की त्यांच्याकडून दोन एके रायफल, सात एके मॅगझिन आणि नऊ ग्रेनेडसह दोषी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Prashant Kishor : काँग्रेससाठी संकटमोचक ठरू शकतात प्रशांत किशोर? किशोर यांच्या प्रवेशाने होणार काँग्रेसमध्ये अनेक बदल

Earthquake : लडाखला भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल

PM Modi Jammu Kasmir Visit : जम्मू आणि काश्मीरची जनता पंचायती राजपासून वंचित होती, अनुच्छेद ३७० हटवून तुम्हाला ताकद दिली

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें