केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे (Smriti Irani tested Corona Positive).

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 7:28 PM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्मृती यांनी स्वत: ट्वीटरवर याबाबत माहिती दिली आहे. स्मृती यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना टेस्ट करण्याचं आवाहन केलं आहे (Smriti Irani tested Corona Positive).

“कोणत्याही प्रकारची घोषणा करताना त्यासंबंधित शब्द शोधणं माझ्यासाठी अवघड आहे. त्यामुळे मी सोप्या शब्दात सांगू इच्छिते. माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर कोरोना टेस्ट करावी”, असं स्मृती इराणी ट्विटरवर म्हणाल्या (Smriti Irani tested Corona Positive).

स्मृती इराणी गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकींमध्ये व्यस्त होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीत स्मृती इराणी भाजप पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. त्या प्रचारसभांमध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली.

स्मृती इराणी यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद, नितीन गडकरी, कृष्णपाल गुर्जर, श्रीपद नाईक, अर्जुन राम मेघवाल, गर्जेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा : शिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.