जेव्हा सापाला पकडण्यासाठी पोलीस गारुडी होतात...

उत्तर प्रदेशात एका पोलीस ठाण्यात अचानक साप घुसल्याने एकच खळबळ उडाली. या सापाला बाहेर काढण्यासाठी चक्क पोलिसांवरच पुंगी वाजवत गारुडी बनण्याची वेळ आली

जेव्हा सापाला पकडण्यासाठी पोलीस गारुडी होतात...

लखनऊ : उत्तर प्रदेशात एका पोलीस ठाण्यात अचानक साप घुसल्याने एकच खळबळ उडाली. या सापाला बाहेर काढण्यासाठी चक्क पोलिसांवरच पुंगी वाजवत गारुडी बनण्याची वेळ आली (Snake charmer).

उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील हीमपूर दीपाच्या एका पोलीस ठाण्यात एक अजब घटना घडली. हीमपूर दीपाच्या मालखाने पोलीस ठाण्यात मंगळवारी (5 नोव्हेंबर) साप घुसला (Snake in Police station). यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सापाला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र साप काही बाहेर येत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी साप पकडण्यासाठी गारुडींना बोलावलं (Snake charmer). त्यांनीही साप पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पुंगी वाजवली पण साप बाहेर पडेना.

पुंगी वाजवून गारुडी थकले, मात्र साप बाहेर आला नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात उपस्थित काही पोलीसच गारुडी बनले आणि पुंगी वाजवू लागले. त्यांनीही खूप वेळपर्यंत पुंगी वाजवली. अखेर पोलीस आणि गारुडींच्या अथक प्रयत्नांनंतर सापाला पकडण्यात यश आलं. यावेळी जेव्हा गारुडी सापाला पकडण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा सापाने त्याचा चावा घेतला. हे पाहून पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला. त्यानंतर दुसऱ्या गारुड्याने लगेच त्याच्या साथीदारावर उपचार केले आणि काही वेळातच तो गारुडी बरा झाला.

मात्र, सापाला पकडण्यासाठी चक्क पोलीसच गारुडी बनल्याने, हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *