पाकिस्तानातून आल्यापासून आर्मीकडून छळ, धुळ्याचा जवान चंदू चव्हाणचा राजीनामा

पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राजीनामा (Indian Soldier Chandu Chavan Resign) दिला आहे.

पाकिस्तानातून आल्यापासून आर्मीकडून छळ, धुळ्याचा जवान चंदू चव्हाणचा राजीनामा

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राजीनामा (Indian Soldier Chandu Chavan Resign) दिला आहे. चंदू चव्हाण यांनी याबाबतचा एक व्हीडिओ नुकतंच सोशल मीडियावर (Indian Soldier Chandu Chavan Resign) पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मी लष्करातील अधिकाऱ्यांचा त्रासाला कंटाळून असून राजीनामा देत असल्याचे (Indian Soldier Chandu Chavan Resign) म्हटलं आहे. मात्र चंदू चव्हाण यांचे हे आरोप लष्काराने फेटाळले आहेत.

लष्काराने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, “चंदूच्या विरोधात जवळपास पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच याबाबतच त्याच्या गुन्ह्याखाली कारवाईही सुरु आहे. काही निवडणुकांमध्ये चंदू हे राजकीय पक्षांना समर्थनार्थ प्रचार केल्याचेही समोर आले होते.” याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

नुकतंच चंदू चव्हाण हे नशेत सापडले होते. याबाबत त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. मात्र गेल्या 3 ऑक्टोबर 2019 पासून सुट्टी न घेता ते युनिटमधून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्यावर शिस्त भंग केल्याप्रकरणी कारवाई केली होती. सैन्यात अशाप्रकारे शिस्तभंग करण्याची परवानगी देत नाही, असंही सैन्याने सांगितले.

चंदू चव्हाण यांची काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाली होती. “मी लेखी स्वरुपात माझ्या वरिष्ठांकडे राजीनामा दिला आहे. मला गेल्या तीन वर्षांपासून अनेक समस्या लेखी स्वरुपात दिल्या आहे. मला पोस्ट हवी आहे आणि मला घरी जायचं आहे, असही मी सांगितलं. मात्र माझं कोणीही ऐकलं नाही.” अशी तक्रार करत चंदू यांनी डी. एम. रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.

मी पाकिस्तानातून सुटल्यापासून माझ्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलला. पाकिस्तानातून आल्यापासून मला सतत मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे माझे मानसिक खच्चीकरण झाले. मला न्याय मिळत नसल्याने मी त्रासाला कंटाळून राजीनामा देतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करणार असे चंदू चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

चंदू चव्हाण हे धुळ्यातील बोरविहीरी गावातील रहिवासी आहेत. चंदू चव्हाण हे 29 सप्टेंबर 2016 रोजी नजरचुकीमुळे भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर तब्बल 3 महिने 21 दिवसांनी म्हणजेच 21 जानेवारी 2016 रोजी त्यांची सुटका झाली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *