संपूर्ण कॉम्प्लेक्सला नव्हे, केवळ स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, भाजपकडून सारवासारव

स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यावर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आता जोरदार वाक् युद्ध सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

संपूर्ण कॉम्प्लेक्सला नव्हे, केवळ स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, भाजपकडून सारवासारव
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 6:42 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यावर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आता जोरदार वाक् युद्ध सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.(Strong criticism between Congress and BJP after naming Motera Stadium as PM Narendra Modi)

“या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं नावं सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह असं आहे. संकुलातील क्रिकेट स्टेडियमला फक्त पंतप्रधान मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. विडंबन या गोष्टीचं आहे की, ज्या परिवाराने सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा सन्मान केला नाही. ते आता रडत आहेत”, अशा शब्दात जावडेकर यांनी गांधी परिवार आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही स्टेडियमच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. कधी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात उंच प्रतिमेचं कौतुक केलं आहे? ते कधी तिथे गेले? यापेक्षा अधिक काय बोललं जाऊ शकतं, अशा शब्दात प्रसाद यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्ला चढवला आहे.

महानायकाचा अपमान- काँग्रेस

स्टेडियमला पंतप्रधान मोदी यांचं नाव देणं म्हणजे सरदार पटेल यांचा घोर अपमान असल्याचं काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलंय. मोटेरा स्टेडियमवरुन सरदार पटेल यांचं नाव हटवून नरेंद मोदी यांचं नाव देणं हा स्वातंत्र्याच्या महानायकाचा घोर अपमान आहे, असं ट्वीट श्रीनेत यांनी केलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांचा उद्देशून तुमच्या गर्व आणि अहंकाराला कुठेतरी सीमा असेल, असंही म्हटलंय.

हार्दिक पटेल यांचंही टीकास्त्र

‘सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही. बाहेरून मित्रता आणि आतून वैर, सरदार पटेल यांच्याबाबत भाजपचा असा व्यवहार राहिला आहे’, अशी टीका गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली आहे.

इतर बातम्या : 

एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस, जावडेकरांची घोषणा

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत महाराष्ट्र अव्वल, पुणे आणि अहमदनगरने पहिला क्रमांक पटकावला

Strong criticism between Congress and BJP after naming Motera Stadium as PM Narendra Modi

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.