AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajinikanth | रजनीकांत यांचे राजकारणातील प्रवेशावर पुनर्विचाराचे संकेत, ‘लीक लेटर’वर म्हणाले…

सुपरस्‍टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी सक्रीय राजकारणातील प्रवेशाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत.

Rajinikanth | रजनीकांत यांचे राजकारणातील प्रवेशावर पुनर्विचाराचे संकेत, 'लीक लेटर'वर म्हणाले...
| Updated on: Oct 29, 2020 | 5:24 PM
Share

चेन्‍नई : सुपरस्‍टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी सक्रीय राजकारणातील प्रवेशाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत योग्यवेळी माझी भूमिका स्पष्ट करेल असं मत रजनीकांत यांनी व्यक्त केलं आहे. सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांच्याविषयीचं एक पत्र व्हायरल होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रात रजनीकांत यांच्या आरोग्याविषयी आणि त्यांना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यावरुन रजनीकांत त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत पुनर्विचार करु शकतात अशी चर्चा आहे (Superstar Rajinikanth on his health and political future).

अनेक लोकांनी दावा केला आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे पत्र स्वतः रजनीकांत यांनीच लिहिलं आहे. यावर रजनीकांत म्हणाले, “हे पत्र मी लिहिलेलं नाही. मात्र, या पत्रात माझ्या आरोग्याविषयी आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याविषयी दिलेली माहिती खरी आहे. मी ‘रजनी मक्‍कल मंदरम’च्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांचा सल्ला घेईल. त्यानंतर माझ्या राजकीय भूमिकेची योग्यवेळी घोषणा करेल.”

रजनीकांत यांना आरोग्याविषयी नेमकी कोणती काळजी?

संबंधित पत्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत आपल्या राजकीय प्रवेशावर पुनर्विचार करत असल्याचं म्हटलं आहे. त्यांची किडनीची स्थिती खराब असल्याने डॉक्‍टरांनी रजनीकांत यांना हालचाल आणि दीर्घ प्रवास न करण्याचा सल्ला दिलाय. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर असा प्रवास करणं धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाची लस हाच कोरोनावरील एकमेव उपाय आहे. ती येऊपर्यंत कोरोनाचा धोका कायम असेल. रजनीकांत यांचं शरीर कोरोना सहन करु शकेल की नाही याविषयी डॉक्टरांनी काळजी व्यक्त केल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मागील 2 वर्षांपासून रजनीकांत अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर पुढाकार घेऊन बोलले आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीतील त्यांचे सहकारी कमल हसन यांच्या तुलनेत त्यांचा औपचारिक राजकीय प्रवेशाला मात्र बराच उशीर झाला आहे. दुसरीकडे अभिनेता कमल हसन यांच्या ‘मक्कल नीधी मैयम’ पक्षाने मागील लोकसभा निवडणुकीतही आपले उमेदवार उतरवले होते.

रजनीकांत यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढी काही दिवसात रजनीकांत आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची व्हर्चुअल मीटिंग घेणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या सुरुवातीला ते आपल्या राजकीय भविष्याविषयी घोषणा करतील. रजनीकांत यांचं हे विधान तामिळनाडुच्या विधानसभा निवडणुका 7 महिन्यांवर असताना आलं आहे. याच निवडणुकीत ते आपला राजकीय प्रवेश करती, असाही अंदाज लावला जातोय. तामिळनाडूत अनेक अभिनेत्यांनी राजकारणात घवघवीत यश मिळवलं आहे. आता रजनीकांत यांना कसा प्रतिसाद मिळतो हे येणारा काळच ठरवणार आहे.

हेही वाचा :

रजनीकांत निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार!

रजनीकांतच्या मुलीचं दुसरं लग्न

दीपिकाचा ‘छपाक’, रजनीकांतचा ‘दरबार’ की अजय देवगणचा ‘तान्हाजी’, कोण मारणार बाजी?

Superstar Rajinikanth on his health and political future

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.