असं केलं तर देव आम्हाला माफ करणार नाही, शेकडो वर्षांच्या जगन्नाथ रथ यात्रेवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरी येथील जगन्नाथ रथेवर तात्पुरती स्थगिती लावली आहे (Supreme court stay on Jagannath Yatra amid Corona).

असं केलं तर देव आम्हाला माफ करणार नाही, शेकडो वर्षांच्या जगन्नाथ रथ यात्रेवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पुरी येथील जगन्नाथ रथेवर तात्पुरती स्थगिती लावली आहे (Supreme court stay on Jagannath Yatra amid Corona). या यात्रेत लाखो लोक एकत्र येतात. त्यामुळे ही यात्रा भरवल्यास कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका आहे. तो धोका होऊ नये म्हणूनच न्यायालयाने जगन्नानाथ यात्रेवर तात्पुरती बंदी घातली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, “23 जून रोजी होणाऱ्या या यात्रेवर बंदी महत्त्वाची आहे. जर ही रथयात्रा झाली, तर भगवान जगन्नाथ आम्हाला कधीही माफ करणार नाहीत. सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या वातावरणात एतक्या मोठ्या गर्दीला परवानगी दिली जाऊ शकत नाही. आरोग्य सुरक्षेचा प्रश्न पाहता या यात्रेवर बंदी आवश्यक आहे.”

भुवनेश्वरमधील ओडिशा विकास परिषद या संस्थेने याबाबत एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटलं होतं, “रथयात्रेला परवानगी दिल्यास हे कोरोना संसर्गाला आमंत्रण असेल. जर आपण प्रदुषणाचा आणि आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन दिवाळीत फटाके वाजवण्यावर प्रतिबंध करु शकतो, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगन्नाथ रथयात्रा का रोखली जाऊ शकत नाही?”

ओडिशा राज्य सरकारने 30 जूनपर्यंत सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी लावली आहे. अशा स्थितीत मंदिर प्रशासनाने भक्तांशिवायच रथ यात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. जगन्नाथ यात्र 9 दिवस चालते. या यात्रेसाठी दरवर्षी 7 लाखाहून अधिक भाविक येतात. या काळात हजारोंच्या संख्‍येने पोलीस आणि सुरक्षा दलाच तैनाती होते. यावर्षी मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता या यात्रेवर बंदी घालण्यात आली आहे. या काळात शारीरिक अंतर (फिजीकल डिस्‍टेन्सिंग), पुरेशा पाण्याअभावी कोरोनाच्या संसर्गाची शक्यता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटीने वाढेल, असंही सांगितलं जात आहे.

या यात्रेच्या पंरपरेनुसार भगवान जगन्‍नाथ आपले मोठे बंधू बलराम आणि बहिण सुभद्रा यांच्यासोबत वेगवेगळ्या रथांवर स्वार होऊन ‘श्री गुंडिचा’ मंदिरात जातात. 9 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी 9 रथ बनवले जातात. भगवान जगन्‍नाथ यांच्यासाठी लाल आणि हिरव्या रंगाचा रथ बनवला जातो, त्याचं नाव ‘तालध्‍वज’ असं होतं. सुभद्रासाठी निळे आणि लाल रंगाचे ‘दर्पदलन’ आणि ‘पद्म रथ’ बनवले जातात. भगवान जगन्‍नाथ यांच्यासाठी पिवळा आणि लाल रंगाचा ‘नदीघोष’ आणि ‘गरुडध्‍वज’ नावाचा रथ बनवला जातो.

हेही वाचा :

Manipur Govt Crisis | मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला सुरुंग, 9 आमदारांची बंडखोरी, तिघे काँग्रेसमध्ये

लोकनेते पुन्हा एकत्र, विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक!

Congress Meeting CM Live | काँग्रेस नेते ‘मातोश्री’वर पोहोचले, संजय राऊतही उपस्थित

Raju Shetti Upset | घरच्या कटारीचे घाव जिव्हारी, नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टी उद्विग्न

Supreme court stay on Jagannath Yatra amid Corona

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *