57 मुस्लिम देशांसमोर सुषमा बरसल्या होत्या, भारत गांधींचा देश, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते!

आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यासू भाषणांनी भारताची मान अभिमानाने उंचवणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री निधन झालं.

57 मुस्लिम देशांसमोर सुषमा बरसल्या होत्या, भारत गांधींचा देश, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते!
Follow us
| Updated on: Aug 07, 2019 | 12:08 AM

Sushma Swaraj Passed Away नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यासू भाषणांनी भारताची मान अभिमानाने उंचवणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी (Sushma Swaraj) वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली.

मंगळवारी सायंकाळीच सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरवर मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. त्यांनी ट्वीट करत सरकारचं अभिनंदन केलं. ”पंतप्रधान मोदीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हा दिवस पाहाण्याच्या प्रतिक्षेत होती”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट प्रक्रियेपासून ते परदेशातील भारतीय समुदायाला एकत्रित आणण्यात क्रांती घडवली.

संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी देशाची मान अनेकदा अभिमानाने उंचावली. दोन वर्षांपूर्वी दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला सळो की पळो केलं होतं.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशी सुनावल्यानंतर सुषमा स्वराज सक्रिय झाल्या. राजदुतामार्फत मदत अर्थात कौन्सिलर एक्सेससाठी त्यांनी स्वतः 16 प्रयत्न केले. हे प्रकरण स्वराज यांच्याच नेतृत्वात आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यात आलं.

सुषमा स्वराज यांनी अबूधाबीतील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन अर्थात OIC मध्ये निवेदन दिलं. OIC मध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला त्या सहभागी झाल्या. यावेळी केलेल्या भाषणात सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख केलाच, शिवाय दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारलं.

जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सुषमा म्हणाल्या, भारत हा गांधींचा देश आहे, इथे प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानलाही खडसावलं होतं.

जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सुषमा म्हणाल्या, भारत हा गांधींचा देश आहे, इथे प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते.

पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, असं त्यांनी नमूद केलं.

“आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवादाने आज प्रत्येक देश त्रस्त आहे. मात्र भारताने दहशतवादाचं भयानक रुप पाहिलं आहे”, असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींसमोर सुषमा म्हणाल्या, भारत गांधींचा देश!

मोदी है तो मुमकीन है! सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांचे आभार मानले  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.