AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu Election Results 2026: तमिळनाडूमध्ये DMK ची नौकाच बुडाली; 34 पैकी 31 मंत्री पिछाडीवर

Tamilnadu Election Results : तमिळनाडू निवडणुकीतील समोर येत असलेले कल हे डीएमकेसाठी वाईट बातमी घेऊन येत आहेत. सत्ताधारी डीएमके कलांमध्ये थेट तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे.

Tamil Nadu Election Results 2026: तमिळनाडूमध्ये DMK ची नौकाच बुडाली; 34 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
Thalapathy Vijay and MK StalinImage Credit source: Instagram
| Updated on: May 04, 2026 | 11:46 AM
Share

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सेंच्युरी मारली आहे. शंभरहून अधिक जागांवर टीव्हीके आघाडीवर आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच तमिळनाडूमध्ये तिसरा पक्ष सत्तेत येताना दिसत आहे. डीएमके आणि एआयएडीमकेसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. विजय यांनी तमिळनाडूच्या राजकारणातील प्रस्थापितांनाच हादरा दिला आहे. डीएमकेनं या निवडणुकीत 234 सदस्यीय विधानसभेत 164 जागांवर निवडणूक लढवली आहे. तर त्यांच्या मुख्य सहकारी काँग्रेस पक्षाने 28 जागांवर निवडणूक लढवली होती. उर्वरित जागांवर डीएमकेच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीतील इतर पक्ष निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षासाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. कारण ट्रेंड्सनुसार, डीएमकेच्या 34 पैकी 31 मंत्री पिछाडीवर आहेत.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्टॅलिन स्वत:च्याच मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तर त्यांचेच पुत्र आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी हेदेखील पिछाडीवर आहेत. स्टॅलिन हे कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर उदयनिधी चेपॉक तिरुवल्लिकेनी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तमिळनाडूच्या राजकारणातील ही सर्वांत मोठी उलथापालथ आहे. जनतेनं सत्ताधारी पक्षांना थेट नाकारत थलपती विजय यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मजबूत आघाडी घेतली आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

तमिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेसह आघाडीला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळण्याचे अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त झालं होतं. मात्र अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षामुळे यंदाची लढाई तिहेरी आणि तितकीच चुरशीची झाली आहे. पदार्पणातच टीव्हीकेची कामगिरी दमदार असल्याचं पहायला मिळतंय. तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 234 जागांपैकी 118 जागांचा जादुई आकडा आहे. विजय यांनी 2024 मध्ये ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पहिल्यांदाच ते निवडणूक लढवत आहेत. विजय हे स्वत: पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

भाजप खासदार मनोज तिवारी यांनी तमिळनाडूतील डीएमकेच्या दुर्दशेवर जोरदार हल्ला चढवला आहे. स्टॅलिन सनातन धर्म नष्ट करायला निघाले होते, पण तमिळनाडूने त्यांनाच संपवलंय. ते महिलांचा अपमान करत होते, आता जनतेनंच त्यांना उत्तर दिलं आहे, अशी टीका तिवारी यांनी केली. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने लोकसभेत नारी शक्ती वंदना कायद्याला विरोध केला होता. विधेयक मंजूर न झाल्याने स्टॅलिन यांनी स्वत: पक्षाच्या मुख्यालयात फटाके फोडले होते.

Follow Us
करुणा मुंडे यांना किती मिळाली मते? चकित करणारी आकडेवारी समोर
करुणा मुंडे यांना किती मिळाली मते? चकित करणारी आकडेवारी समोर.
तमिळनाडूत राजकीय उलथापालथ; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, डीएमकेला धक्का
तमिळनाडूत राजकीय उलथापालथ; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, डीएमकेला धक्का.
मोठी बातमी! कलांनुसार आघाडीवर असताना सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना
मोठी बातमी! कलांनुसार आघाडीवर असताना सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना.
तमिळनाडूत मोठा राजकीय धक्का; विजयच्या टीव्हीकेची आघाडी, डीएमके.....
तमिळनाडूत मोठा राजकीय धक्का; विजयच्या टीव्हीकेची आघाडी, डीएमके......
प.बंगालमध्ये भाजपा 24 जागांवर पुढे तर टीएमसी...सुरुवातीच्या कलांमध्ये
प.बंगालमध्ये भाजपा 24 जागांवर पुढे तर टीएमसी...सुरुवातीच्या कलांमध्ये.
बारामतीत सुनेत्रा पवारांचा झंझावात तर राहुरीत कर्डिलेची भक्कम आघाडी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा झंझावात तर राहुरीत कर्डिलेची भक्कम आघाडी.
तामिळनाडूत विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार?
तामिळनाडूत विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार?.
पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण?
पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण?.
पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत
पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत.
केरळमध्ये एलडीएफ-यूडीएफमध्ये काट्याची टक्कर
केरळमध्ये एलडीएफ-यूडीएफमध्ये काट्याची टक्कर.