कर्मचारी रुग्णाला MRI मशीनमध्ये ठेवून बाहेर काढायला विसरले आणि...

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एका रुग्णाला एमआरआय मशीनमध्ये तपासणीसाठी (technician staff forgot take patient out from MRI machine checkup ) दाखल झाले. मात्र त्यानंतर त्या रुग्णाला काढायला विसरले.

कर्मचारी रुग्णाला MRI मशीनमध्ये ठेवून बाहेर काढायला विसरले आणि...

चंदीगड (हरियाणा) : हरियाणातील पंचकुला सेक्टर 6 मधील सरकारी रुग्णालयात एका रुग्णाच्या एमआरआय (MRI) चाचणीदरम्यान निष्काळजीपणा समोर आला आहे. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एका रुग्णाला एमआरआय मशीनमध्ये तपासणीसाठी (technician staff forgot take patient out from MRI machine checkup ) दाखल झाले. मात्र त्यानंतर त्या रुग्णाला काढायला विसरले. राम मेहर असे या रुग्णाचे नाव आहे. सुदैवाने यात राम यांना कोणतीही दुखापत (technician staff forgot take patient out from MRI machine checkup)  झाली नाही.

राम मेहर यांना काही कारणात्सव डॉक्टरांनी एमआरआय चाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर राम मेहर (50) हे चाचणीसाठी पंचकुला सेक्टरमध्ये गेले. या रुग्णालयातील एमआरआय अँड सिटी स्कॅन सेंटरमध्ये ते गेल्यानंतर त्यांना कर्मचाऱ्यांनी एमआरआय मशीनमध्ये दाखल केलं. मात्र त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर दुर्लक्ष केले आणि त्यांना मशीनमधून बाहेर काढायला विसरले.

राम मेहर यांनी बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. राम यांनी बळाचा वापर करत हात-पायांची हालचाल केली. त्यामुळे त्यांचा पट्टा तुटला आणि त्यानंतर ते स्वत: त्या मशिनमधून बाहेर आले. दरम्यान यानंतर राम यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी एमआरआय अँड सिटी स्कॅन सेंटरच्या कर्मचाऱ्यांवर निष्काळीपणचा गंभीर आरोप केला आहे.

याप्रकरणी राम मेहर यांनी हरियाणाच्या आरोग्य मंत्री अनिल विज यांच्याकडेही याबाबत तक्रार (technician staff forgot take patient out from MRI machine checkup) दाखल केली आहे. तसेच राम यांनी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सूरजभान कंबोज यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. जर मी पुढच्या 30 सेकंदात त्यातून बाहेर पडलो नसतो, तर माझा मृत्यू झाला असता असे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान याबाबत एमआरआय सेंटरचे प्रमुख अमित खोखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाचे 20 मिनिटे स्कॅन होते. यात शेवटची 3 मिनिटे पडताळणी सुरु होती. यातील केवळ 2 मिनिटे शिल्लक होती. मात्र त्यावेळी ते रुग्ण घाबरले आणि अचानक हलू लागले. त्यावेळी आम्ही त्यांना हलण्यास मनाई केली, असे ते म्हणाले.

त्यांच्या स्कॅन वेळी टेक्नीशियन दुसऱ्या मशिनवर नोंदणी करत होते. शेवटचा 1 मिनिटं बाकी असताना तो रुग्ण अचानक मशीनमधून बाहेर आला. त्यानंतर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला बाहेर काढलं, असेही त्यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *