Sanjay Raut:दोघांचे कॅबिनेट हा देशात चेष्टेचा विषय, यापूर्वी महाराष्ट्राची अशी चेष्टा झाली नव्हती, खासदार संजय राऊतांची टीका

राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला मिळालेलं बहुमत हे पाकिटमारीतून मिळवलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. संजय राऊत सातत्याने हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सांगत आहेत.

Sanjay Raut:दोघांचे कॅबिनेट हा देशात चेष्टेचा विषय, यापूर्वी महाराष्ट्राची अशी चेष्टा झाली नव्हती, खासदार संजय राऊतांची टीका
मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 4:59 PM

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत पोहचलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारवर जोरदार टीका केली आहे.अत्यंत बालिशपणे राज्याचा कारभार सुरू आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, जगात कुठे दोघांचे मंत्रिमंडळ कोणी पाहिले का ?, असा सवालही त्यांनी केला आहे. ३० जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांचा शपथविधी झाला. त्यानंतर आता १६ दिवस उलटून गेले तरी राज्यात मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही. दर दोन-तीन दिवसांनी नवी तारीख मिळतानाची चर्चा आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राऊत यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले आहे.

ठाकरे सरकारचा निर्णय का रद्द केला?

संभाजीनगर धाराशिव ही नावं देणं लोकभावना आहे, त्याबाबत ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता तो निर्णय हे सरकार कसं रद्द करू शकतं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांनी बहुमत सद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे यांनी तीन नामांतरांचा निर्णय घेतला होता. मात्र तो निर्णय कायदेशीर नसल्याचे सांगत, शिंदे आणि फडणवीसांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा तो निर्णय घेतला आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी सराकरला लक्ष्य केले आहे.

हे बहुमत पाकीटमारीमधून मिळवलेले आहे

राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला मिळालेलं बहुमत हे पाकिटमारीतून मिळवलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. संजय राऊत सातत्याने हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सांगत आहेत. जोपर्यंत अपात्र आमदारांबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात होत नाही, तोपर्यँत झालेला शपथविधी, विश्वासमत ठराव हे सर्व बेकायदेशीर असल्याचे खासदार संजय राऊत यांचे म्हणणे आहे. सरकारला मिळालेलं बहुमत हे पाकिटमारीतून मिळालेलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

देशातील लोकशाही धोक्यात-राऊत

देशातील लोकशाही धोक्यात आहे, असे राऊत म्हणाले आहेत. संसदेत काही शबंदांना बंदी घालण्यात आली आहे, तसेच संसदेच्या आवारात आंदोलन करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत संजय राऊत यांनी मोदी सरकारवरही टीका केली आहे. संसदेच अधिवेशन घेतायेत हेच नशीब, असे सांगत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. आज शिवसेना फुटल्याच्या काही जणांना गुदगुल्या होत आहेत मात्र शिवसेना अशी फुटणार नाही, असेही राऊत म्हणालेत. लोकसभेतही शिवसेनेचा नेता कोण याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. भावना गवळी यांच्याऐवजी त्या ठिकाणी राजन विचारे यांच्या नावाचे पत्र शिवसेनेनं दिले असले, तरी लोकसभा सचिवालयाकडून याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.