चोरांचं डेअरिंग, थेट मोदींच्या पुतणीची पर्स मारली!

देशाची राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Nephew purse stole) यांच्या पुतणीची लूट करण्यात आली आहे.

चोरांचं डेअरिंग, थेट मोदींच्या पुतणीची पर्स मारली!

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Nephew purse stole) यांच्या पुतणीची लूट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दिल्लीतील व्हीव्हीआयपी भाग (Crime in Delhi VVIP area) असलेल्या सिव्हील लाईन्स येथे घडली. त्यामुळे पोलिसांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दमयंती मोदी या नरेंद्र मोदींचे भाऊ प्रहलाद मोदी यांची मुलगी आहे.

दमयंती मोदी दिल्लीतील सिव्हील लाईन्स येथून जात असताना अचानक स्कुटीवर आलेल्या 2 चोरांनी दमयंती यांच्यावर झडप मारून पर्स ओढत पळ काढला. पर्समध्ये 56 हजार, मोबाईल आणि महत्वाची कागदपत्रे होती. या प्रकरणी दमयंती मोदी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. दिल्ली पोलीस याचा तपास करत आहेत. लवकरात लवकर चोरांना पकडले जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी दमयंती मोदी.

दमयंती मोदी आज (12 ऑक्टोबर) सकाळी अमृतसरहून दिल्लीत परतत होत्या. त्यांनी सिव्हील लाईन परिसरात गुजराती समाज भवनमध्ये आपली रुम बुक केली होती. त्यामुळे त्या आपल्या कुटुंबीयांसह जुन्या दिल्लीतून ऑटोने गुजराती समाज भवनात पोहचल्या. गेटवर पोहचून त्या खाली उतरतच होत्या, तेवढ्यात अचनाक 2 दुचाकीस्वारांनी त्यांची पर्स हिसकावून घेतली. त्यांनी इतरांना मदतीला बोलावण्याच्या आतच चोर पर्स घेऊन फरार झाले.

दमयंती मोदी यांना आज सांयकाळी अहमदाबादसाठी परतायचं आहे. त्यांनी सायंकाळचे विमान तिकीटही बूक केलं आहे. मात्र, पर्ससोबत कागदपत्रेही चोरी झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी चोरीची घटना घडली तेथून काही अंतरावरच दिल्लीच्या उपराज्यपालांचं घर आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थानही तेथेच आहे. असं असताना झालेली ही चोरीची घटना गंभीर मानली जात आहे.

दिल्लीत चोरीच्या घटना हा सामान्य नागरिकांसमोरचा मोठा प्रश्न आहे. मात्र, याची झळ आता व्हीआयपींनाही बसू लागली आहे. त्यामुळे चोरांना पोलिसांची भीतीच नसल्याचं बोललं जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI