हा छोटासा जीव आहे जगातील सर्वात विषारी, नागापेक्षाही महाभयंकर, विषाच्या एका थेंबात मृत्यू
तुम्ही जर कोबरा अर्थात नागाला सर्वात खतरनाक आणि विषारी मानत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. पृथ्वीवरील एक छोटासा जीव हा नागापेक्षाही अधिक विषारी आहे.

तुम्ही जर कोबरा अर्थात नागाला सर्वात खतरनाक आणि विषारी मानत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. किंग कोबरा हा विषारी आणि खतरनाक साप नक्कीच आहे. मात्र तो सर्वात विषारी प्राणी नाहीये, जगात असा देखील एक जीव आहे, जो नागापेक्षाही खतरनाक आहे. स्टफ वर्क्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही प्राण्याची धोकादायकता त्याच्या अत्यंत विषारी असण्यावरून किंवा त्याने दंश केल्यानंतर व्यक्तीचा मृत्यूदर किती आहे, यावरून ठरते.
स्टफ वर्क्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जियोग्राफी कोन स्नेल हा जगातील सर्वात विषारी जीव आहे, जियोग्राफी कोन स्नेल ही खरतर एक समुद्री गोगलगाय आहे. तिला कॉनस जियोग्राफस देखील पण म्हणतात. या गोगलगायीची शिकार करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. या गोगलगायीचं विष इतकं विषारी आहे, की विषाच्या एका थेंबामध्येच माणसाचा जीव जातो. आतापर्यंत कुठल्याही वैज्ञानिकाला या विषावर उपाय शोधता आलेला नाहीये.
आतापर्यंत 40 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू
स्टफ वर्क्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जियोग्राफी कोन स्नेल ही गोगलगाय इंडो- पॅसिफिक समुद्राच्या खडकांमध्ये आढळते. या गोगल गायीच्या विषामध्ये 100 पेक्षा अधिक टॉक्सिक पदार्थांचे मिश्रण असते, त्यामुळे ही गोगलगाय चावताच क्षणी कोणत्याही व्यक्तीचा लगेच मृत्यू होऊ शकतो. आतापर्यंत या विषावर तोड शोधण्यात यश आलेलं नाहीये, या गोगलगायीचं विष हे नागापेक्षा अधिक विषारी असतं. समुद्रातील छोटे-छोटे मासे हेच या गोलगायीचं मुख्य खाद्य आहे. आतापर्यंत या गोगलगायीने डंख मारलेल्या 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही गोगलगाय चावल्यानंतर मृत्यू होण्याचा रेट 65 टक्के एवढा प्रचंड आहे.
मात्र तुम्ही जर नागाचा विचार करत असाल तर समजा एखाद्या व्यक्तीला नाग चावल तर नागाच्या विषावर उपचार उपलब्ध आहेत, त्यामुळे नाग चावलेल्या व्यक्तीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो, मात्र या समुद्री गोगलगायी ज्या आहेत, त्या दुर्गम ठिकाणी खोल समुद्रात आढळतात, त्यामुळे तीने दंश केल्यानंतर लगेचच उपचार मिळणं शक्य होत नाही, त्यामुळे आशा घटनेत अनेकांचा मृत्यू होतो.
