कोळसा घोटाळा प्रकरण : तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या मागे ईडीपिडा; सोमवारी चौकशी

कोळसा घोटाळा प्रकरण : तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या मागे ईडीपिडा; सोमवारी चौकशी
तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या मागे ईडीपिडा; सोमवारी चौकशी

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार पश्चिम बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव पचवू शकले नाही. त्याच नैराश्यातून भाजपकडून आपल्या राजकीय स्वार्थांसाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, असा सडेतोड आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 21, 2022 | 1:41 AM

कोलकाता : महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकारची तपास यंत्रणा ईडी असा संघर्ष सुरू असतानाच आता अशाच संघर्षाला कोलकात्यामध्ये तोंड फुटले आहे. बहुचर्चित कोळसा घोटाळा प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांच्या मागे ईडीपिडा लागली आहे. दोघांना चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहावे लागणार आहे. अभिषेक यांची सोमवारी, तर त्यांच्या पत्नी रुजिरा यांची मंगळवारी चौकशी होणार आहे. पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळ्या (Coal Scam)शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात हे दोघे रविवारी दिल्लीत पोहोचले. अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत. अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी हे दोघेही 21 आणि 22 मार्च रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत चौकशीसाठी ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर होणार आहेत. दोघांना ईडीने बजावलेल्या समन्सवरून नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. कोलकाता पोलिसांनीही ईडीच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. (Trinamool MP Abhishek Banerjee’s ED probe into coal scam)

अभिषेक बॅनर्जींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

ईडीने चौकशीसाठी समन्ज्स बजावल्याच्या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी भाजपच्या केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार पश्चिम बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव पचवू शकले नाही. त्याच नैराश्यातून भाजपकडून आपल्या राजकीय स्वार्थांसाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, असा सडेतोड आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. मी नोव्हेंबर 2020 मध्ये जाहीर सभेत म्हटल्याप्रमाणे माझ्यावर 10 पैशांचाही गैरव्यवहार केल्याचा आरोप कोणी सिद्ध केला तर मी स्वत: पुढे येऊन लोकांसमोर फाशी घेईन. ईडी आणि सीबीआयला माझ्यामागे लावण्याची गरज नाही, असेही अभिषेक यांनी यावेळी नमूद केले.

बॅनर्जी दाम्पत्याने समन्सविरोधात हायकोर्टात मागितली होती दाद

अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या पत्नी रुजिरा यांनी यापूर्वी ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आम्ही दोघेही पश्चिम बंगालचे रहिवासी आहोत. त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हजर राहण्यासाठी ईडीने बोलावू नये, असे बॅनर्जी दाम्पत्याने आपल्या याचिकेत म्हटले होते. त्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी फेटाळली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याच प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अभिषेक बॅनर्जी यांची आठ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. आता नव्याने बजावलेल्या समन्सनुसार अभिषेक बॅनर्जी यांची सोमवारी तर रुजिरा बॅनर्जी यांची मंगळवारी ईडी चौकशी होणार आहे. (Trinamool MP Abhishek Banerjee’s ED probe into coal scam)

इतर बातम्या

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात खिळे असलेल्या दांडक्याने तरुणाला मारहाण, डोळ्यात आणि डोक्यात खिळे घुसले

Ambernath Theft : अंबरनाथमध्ये चोरी आणि घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल, चोरट्याला पोलिसांकडून बेड्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें