पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार, कोण आहे गाजी राशीद?

श्रीनगर: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी राशीदचा खात्मा (Abdul Rasheed Ghazi ) करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. गाजी राशीद आणि कामरान या दोन दहशतवाद्यांचा खात्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गाजी राशीदनेच पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याचाच बदला जवानांनी त्याचा खात्मा करुन घेतला. दरम्यान पुलवामाजवळ पिंगलान येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु …

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार, कोण आहे गाजी राशीद?

श्रीनगर: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी राशीदचा खात्मा (Abdul Rasheed Ghazi ) करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. गाजी राशीद आणि कामरान या दोन दहशतवाद्यांचा खात्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गाजी राशीदनेच पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याचाच बदला जवानांनी त्याचा खात्मा करुन घेतला.

दरम्यान पुलवामाजवळ पिंगलान येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीदरम्यान जवानांनी गाजी राशीद आणि कामरानला कंठस्नान घातलं. काल रात्रीपासून या भागत चकमक सुरु आहे.

कोण आहे गाजी राशीद?

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर हा आपल्या भाच्याद्वारे काश्मीर घाटीत दहशतवादी हल्ले करत असतो. गेल्यावर्षी भारतीय जवानांनी ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अंतर्गत त्याला ठार करण्यात आलं. त्यानंतर मसूद अजहरने काश्मीरची जबाबदारी आपला टॉप कमांडर आणि आयईडी एक्स्पर्ट गाजी राशीदवर सोपवली होती.

गाजी राशीद हा डिसेंबर महिन्यातच दोन साथीदाऱ्यांसह भारतात घुसला होता. तो दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसला होता. गाजी राशीद हा मौलाना मसूद अजहरचा अत्यंत विश्वासू साथीदार आहे.

गाजी राशीद 2008 मध्ये जैश ए मोहम्मदमध्ये सहभागी झाला होता. त्याने तालिबानमध्ये प्रशिक्षण घेतलं. मग तो 2010 मध्ये उत्तर वझीरिस्तानमध्ये आला, तेव्हापासूनच दहशतवादी दुनियेत त्याचा हैदोस सुरु आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काश्मीरी तरुणांची माथी भडकवून त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम गाजी राशीद करत होता.

पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदने भ्याड दहशतवादी हल्ला केला. यात भारतीय लष्करातील 40 जवान शहीद झाले. त्यानंतर चार दिवसांनी आज पुन्हा पुलवामातच हल्ला करण्यात आला. यावेळी भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, एका इमारतीत दहशतवादी लपले होते. दोन्ही बाजूंनी चकमक सुरु झाली होती. या चकमकीत मेजर डी. एस. डोंडियाल यांच्यासह 5 जवान शहीद झाले. तसेच, एका स्थानिक नागरिकाचाही यात मृत्यू झाला.

आज 5 जवान शहीद

पुलवामा हल्ल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे आज पुन्हा पुलवामातील पिंगलान परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 55 राष्ट्रीय रायफल्सचे 5 जवान शहीद झाले. मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सेवा राम, शिपाई अजय कुमार, शिपाई हरी सिंग हे जवान शहीद झाले. तसेच एका स्थानिक नागरिकाचाही चकमकीदरम्यान मृत्यू झाला.

संबंधित बातम्या 

पुलवामाचा पहिला बदला, मास्टरमाईंड गाजी राशीदचा खात्मा  

LIVE : पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा, चार जवान शहीद   

Pulwama Attack: हिंजवडी ‘आयटी हब’ला ‘हाय अलर्ट’, सुरक्षा वाढवली 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *