AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला, घराला भीषण आग, भाजप हादरला; मंत्री घरी नव्हते म्हणून…

केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह ऊर्फ आरके सिंह यांच्या घरालाच लक्ष्य करण्यात आलं आहे. इंफाळमधील संतप्त जमावाने काल रात्री सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांच्या घराचं नुकसान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला, घराला भीषण आग, भाजप हादरला; मंत्री घरी नव्हते म्हणून...
Union minister RK Ranjan SinghImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2023 | 9:03 AM
Share

इंफाळ : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेली हिंसा थांबण्याचं नावच घेत नाहीये. मणिपूरमध्ये थांबून थांबून हिंसा होत आहे. या हिंसक आंदोलकांनी आता थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांनाच टार्गेट केलं आहे. हिंसक आंदोलकांनी आरके रंजन सिंह यांच्या घरालाच आग लावली आहे. मंत्र्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांचं घर जाळलं आहे. मात्र, सिंह हे घरी नव्हते, त्यामुळे थोडक्यात बचावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इंफाळमध्ये संचारबंदी लागू असतानाही जमावाने संचारबंदी झुगारून केंद्रीय मंत्र्याच्या घरावर धडक दिली. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त असतानाही जमावाने मंत्र्याचं घर पेटवून दिलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भाजप हादरून गेला आहे.

मैतेई आणि कुकी समुदायात गेल्या दोन महिन्यापासून तणाव सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मणिपूरला आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील हिंसेचा आढावा घेतला होता. अधिकारी आणि काही प्रतिष्ठीत लोकांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात हिंसा भडकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राज्यातील हिंसाचार पाहता स्थानिक आमदारांनी आपल्या घराबाहेर एक बॉक्स ठेवला आहे. लुटमार करून आणलेली आणि हिसकावून आणलेली हत्यारे या बॉक्समध्ये टाका, असं या बॉक्सवर लिहिण्यात आलं आहे. नागरिकांनी हिंसा करू नये म्हणून आमदारांनी ही शक्कल लढवली आहे.

केरळला होते म्हणून…

केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह यांच्या इंफाळ येथील घरावर काल रात्री अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पेट्रोल बॉम्ब फेकताच आगीने पेट घेतला आणि घरभर आग पसरली. घराला आग लागताच घरातील लोक तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. आंदोलकांनी थेट मंत्र्यांच्याच घराला लक्ष्य केल्याने राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मंत्री राजकुमार सिंह हे केरळ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या हल्ल्यातून ते बचावले आहेत.

सुदैवाने सर्व सुरक्षित

केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावण्यात आली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर माझ्या राज्यात जे काही होतंय ते पाहून मला दु:ख झालं आहे. आता सर्वांनी शांतता राखावी असं माझं आवाहन आहे. असा प्रकारच्या हिंसेत जे लोक सहभागी झाले आहेत, ते अमानवी आहे, असं केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह यांनी सांगितलं.

मी एका कामानिमित्ताने केरळला आलेलो आहे. काल रात्री इंफाळ येथील माझं घर पेटवून दिलंय. सुदैवाने त्यात कोणताही जीवित हानी झाली नाही. हिंसक लोक पेट्रोल बॉम्ब घेऊन आले होते. त्यांनी घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले. त्यामुळे लागलेल्या आगीत माझ्या घराच्या तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर मोठं नुकसान झालं आहे.

Follow Us
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद