Uttarakhands Chamoli Glacier burst rescue operation LIVE : एकूण 197 जण बेपत्ता, 192 नागरिकांची नावं समोर

| Updated on: Mar 31, 2021 | 6:46 AM

उत्तराखंडमधील रेस्क्यू ऑपरेशनची प्रत्येक अपडेट LIVE

Uttarakhands Chamoli Glacier burst rescue operation LIVE : एकूण 197 जण बेपत्ता, 192 नागरिकांची नावं समोर

देहरादून : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून (Uttarakhand chamoli glacier burst) झालेल्या भीषण दुर्घटनेला आता अनेक तास उलटले आहेत. मात्र बचावकार्य अजूनही सुरु आहे. आतापर्यंत 30 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अजूनही जवळपास 197 लोक बेपत्ता आहेत. उत्तराखंडमधील जोशीमठ तालुक्यात चमोली परिसरात मोठं नुकसान झालं आहे. हिमनग कोसळून खाली आल्यानं पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ होऊन जिल्ह्यातील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचा बांध फुटला आणि धौलगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका पाण्याच्या प्रवाहाजवळ असलेल्या गावांनाही बसला. अनेक घरात पाणी शिरलं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Feb 2021 02:26 PM (IST)

    एकूण 197 जण बेपत्ता, 192 नागरिकांची नावं समोर

    उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्यानंतर चमोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत एकूण 197 जण बेपत्ता झाले असून त्यापैकी 192 जणांची नावं समोर आली आहेत. आतापर्यंत एकूण 30 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान बचावपथकाकडून मदतकार्य अजूनही सुरुच आहे.

  • 09 Feb 2021 01:16 PM (IST)

    तपोवन टनेलमध्ये काही नगरिक अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे, पाहा टनेलचा आराखडा

    तपोवन टनेलचा आराखडा

  • 09 Feb 2021 12:13 PM (IST)

    उत्तराखंड सरकाला हरियाणाची मदत, दिले 11 कोटी रुपये

    हिमस्खल झाल्यामुळे चमोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उत्तराखंडला 11 कोटी रुपयांची मदत केली. या अपघातात आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला असून 171 जण बेपत्ता आहेत.

  • 09 Feb 2021 10:12 AM (IST)

    NDRF ची अतिरिक्त टीम जोशीमठाकडे रवाना

    उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्यानंत येथे मोठी जीवितहानी झाली. जोशीमठ परिसरात अनेक नागरिक अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येथे मदतीसाठी एनडीआरएफची अतिरिक्त तुकडी रवाना झाली आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारमधील मंत्री सुरेश राणा, मंत्री धर्म सिंह सैनी आणि राज्यमंत्री विजय कश्यप आज उत्तराखंड येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

  • 09 Feb 2021 09:16 AM (IST)

    मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याकडून घटनास्थळाची हवाई पाहणी

    उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्या हिमस्खलन झाल्यानंतर या भागाची येथील मुंख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी हवाई पाहणी केली. येथील बोगद्यात एकूण 30-35 लोक अडकलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

  • 09 Feb 2021 09:11 AM (IST)

    जखमी झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत भेटले, केली प्रकृतीची विचारपूस

  • 09 Feb 2021 08:16 AM (IST)

    बोगदा आज दुपारपर्यंत मोकळा होण्याची शक्यता, एकूण 26 जणांचा मृत्यू

    उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरातील बोगदा अजूनही पूर्णपणे मोकळा झालेला नाही. अजूनही बोगदा साफ करण्याचे काम सुरु आहे. आज दुपारपर्यंत बोगदा मोकळा होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 09 Feb 2021 08:02 AM (IST)

    उत्तराखंडमधील हिमस्खलनात एकूण 171 जण बेपतात, नेपाळच्या 2 नागरिकांचा समावेश

    उत्तराखंडमधील चघोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्यानंतर एकूण 171 जण बेपत्ता आहेत. यामध्ये वेगवेगळ्या नागरिकांचा समावेश आहे. उत्तराखंडमधील 42, उत्तर प्रदेश- 42, झारखंड-13, बिहार-03, पश्चिम बंगाल-3, पंजाब-4, जम्मू कश्मीर-2, नेपाळ-2 असे नागरिक बेपत्ता झाले आहेत.

  • 09 Feb 2021 07:16 AM (IST)

    ITBP च्या जवानांकडून बचावकार्य सुरुच, रात्रभर बोगदा साफ करण्यासाठी प्रयत्न

    उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळ्यानंतर अनेक नागरिक जोशीमठ परिसरात अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे आयटीबीपीच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार ITBP च्या टीमने रात्रभर तपोवन येथील बोगदा साफ करण्याचे काम केले. आतापर्यंत 26 नागरिकांचे मृतदेह सापडले असून आणखी 171 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

  • 09 Feb 2021 07:12 AM (IST)

    जोशीमठ परिसरात अजूनही बचावकार्य सुरु, उत्तर प्रदेश सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी

    उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले. उत्तरप्रदेशमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करुन परिस्थितीचा आढावा घेतला. येथील सरकारने नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. 1070 तसेच 9454441036 या व्हाट्सअ‌ॅप नंबरवर नागरिकांना मदतीसाठी संपर्क करता येईल.

  • 08 Feb 2021 06:02 PM (IST)

    बचावकार्यासाठी 20 कोटींच्या अपत्कालीन निधीस मंजुरी

    उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्यानंतर येथील मुंख्यमंत्री त्रिवेंद सिंह रावत यांनी समीक्षा बैठकीचे आयोजन केले. यावेळी त्यांनी सुरु असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी राज्य आपत्कालीन निधी कोषातून चमोली जिल्ह्यात हिमस्खल झाल्यानंतर बाचावकार्यासाठी 20 कोटींच्या निधीस मंजुरी दिली.

  • 08 Feb 2021 04:15 PM (IST)

    तपोवन बोगद्याच्या मुख्य दरवाजाची साफसफाई, अनेक नागरिक अडकल्याची भीती

    तपोवन बोगद्याचे मुख्य द्वार आयटीबीपीच्या जवानांकडून साफ केले जात आहे. बोगद्यामध्ये अनेक लोक अडकले असलण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे ही आयटीपीच्या जवानांकडून हे काम सुरु आहे.

  • 08 Feb 2021 03:17 PM (IST)

    बोगद्यामध्ये दोन जेसीबी, एक क्रेन, एक गाडी अडकली, काही मजूरही अडकल्याचा अंदाज

    उत्तराखंडमधील जोशीमठजवळी असलेल्या 220 मीटर लांबीच्या बोगद्यामध्ये एक कार ,2 जेसीबी मशीन आणि एक क्रेन अडकल्याची शक्यता आहे. हिमस्खलन झाल्यानंतर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी काही लोक या गाड्यांमध्ये बसण्यासाठी गेल्याची शक्यता वर्तविली जातेय. त्यामुळे बाचवपथकाकडून बोगद्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

  • 08 Feb 2021 02:10 PM (IST)

    18 मृतदेह आढळले, आतापर्यंत 28 जणांना वाचवण्यात यश

    उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्यानंतर येथे हाहाकार उडाला. झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच बचाव पथकाने आतापर्यंत 28 जणांची सुटका केली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आणखी 202 नागरिक बेपत्ता आहेत.

  • 08 Feb 2021 02:05 PM (IST)

    एकूण 13 गावांचा संपर्क तुटला, चमोली जिल्हा प्रशानसकाकडून हेलिकॉप्टरद्वारे मदत

    उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला आहे. हिमस्खलनामुळे रस्ता तसेच पूल वाहून गेल्यामुळे एकूण 13 गावांशी संपर्क तुटला आहे. या गावातील नागरिकांना चमोली प्रशासनाद्वारे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत पुरविली जात आहे. गांवातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून रेशन, औषधी, तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत.

  • 08 Feb 2021 01:02 PM (IST)

    उत्तराखंडमध्ये बाचवकार्य आणि संशोधनासाठी वायूसेनेची मदत, विमानाची लगातार उड्डाणं

    उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्यानंतर बचावकार्य करणासाठी भारतीय वायूदल सरसावले आहे. वायूदलाकूडन लगातार विमानाची उड्डाणं सुरु असून मदतकार्य सुरु आहे. वायूसेनेने दिलेल्या माहितीनुसार DRDO च्या 6 वैज्ञानिकांना संशोधन करण्यासाठी त्यांना त्यांच्या उपकरणासहित घटनास्थळी पोहोचविण्यासाठी वायूदल मदत करत आहे. त्यासाठी एका एएलएच हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानाच्या माध्यमातून देहरादूनपासून जोशीमठापर्यंत मदत पोहोचवली जात आहे.

  • 08 Feb 2021 12:08 PM (IST)

    27 जणांची सुटका, 11 जणांचा मृत्यू, अजूनही 153 जण बेपत्ता : NDRF DG

    उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्यानंतर एनडीआरएफ, आयटीबीपीकडून बचावकार्य सुरु आहे. NDRF चे डीजी एस.एन प्रधान यांनी सांगितल्याप्रमाणे 2.5 किमी असलेल्या लंबू बोगद्यात बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत 27 जणांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे. तर, 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 153 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात ये असल्याची माहिती एस. एन. प्रधान यांनी दिली आहे. बेपत्ता नागरिकांपैकी 40-50 लोक बोगद्यात अडकेलेले असण्याची शक्यता असून बाकीचे लोक वाहून गेल्याची शक्यता असल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे.

  • 08 Feb 2021 11:49 AM (IST)

    80 मीटरपर्यंत बोगद्याची सफाई, अजूनही 100 मीटर बाकी

    ITBP च्या जवानांकडून पूर्ण क्षमतेने बचावकार्य सुरु आहे. चमोली मधील तपोवन येथील बोगद्यात अजूनही 35 नागरिक अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या बोगदा 80 मीटरपर्यंत साफ झाला असून अजूनही 100 मीटर बोगद्याची सफाई बाकी आहे. ही सफाई युद्धपातळीवर सुरु आहे.

  • 08 Feb 2021 11:45 AM (IST)

    भूयारात आणखी 35 जण अडकल्याचा अंदाज, पूर्ण क्षमतेने बचावकार्य सुरु

    उत्तराखंडमधील जोशीमठपरीसरातील भूयारामध्ये अजूनही रेस्क्यू ऑपरशेन सुरु आहे. येथे अजूनही 35 जण अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ITBP च्या जवानांकडून पूर्ण क्षमतेने बचावकार्य सुरु आहे.

  • 08 Feb 2021 11:38 AM (IST)

    हिमस्खलनाचे कारण शोधण्यासाठी ISRO च्या वैज्ञानिकांची मदत घेणार, उत्तराखंडच्या मुंख्यमंत्र्यांची माहिती

    उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमस्खलन झाल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय. असूनही येथे बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, ISRO संस्थेतील वैज्ञानिकांची मदत घेऊन, हिमकडा कोसळण्याचे कारण शोधण्यात येणार आहे. उत्तराखंड चे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी तशी माहिती दिली आहे. "भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडून नयेत म्हणून इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या मदतीने हिमकडा कोसळण्याचे कारण शोधण्यात येणार आहे. तशा सूचाना मी मुख्य सचिवांना दिल्या आहेत," असे त्रिवेंद सिंह रावत म्हणाले.

Published On - Feb 09,2021 2:26 PM

Follow us
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.