AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंदे भारत मेट्रोचा पहिला लूक आला समोर; कमी वेळेत कापणार जास्त अंतर, कुठे तयार होत आहे ही खास रेल्वे

Vande Bharat Metro : वंदे भारत ट्रेनने देशात वेगवान प्रवासाची नांदी आणली आहे. विमान प्रवाशी पण या जलद प्रवासाकडे वळाले आहे. देशात अनेक शहरांना ही ट्रेन जोडते. आता वंदे भारत मेट्रो पण अनेक शहरात मोठी क्रांती आणणार आहे. दोन शहरांतील मोठे अंतर अवघ्या काही तासात, मिनिटात पूर्ण होणार आहे. तिचा फर्स्ट लूक पाहिलात का?

वंदे भारत मेट्रोचा पहिला लूक आला समोर; कमी वेळेत कापणार जास्त अंतर, कुठे तयार होत आहे ही खास रेल्वे
वंदे भारतचा फर्स्ट लूक पाहिलात का?
| Updated on: May 07, 2024 | 11:22 AM
Share

Vande Bharat Metro कधी सुरु होणार असा प्रश्न देशातील कोट्यवधी प्रवाशांना पडला आहे. देशातील अनेक मेट्रो शहरात आणि निम्न शहरात मेट्रोचे जाळे दिवसागणिक विस्तारत आहे. त्यातच वंदे भारत ट्रेन देशात लोकप्रिय ठरली आहे. जलद आणि खिशाला परवडणाऱ्या या रेल्वेने प्रवाशांची मनं जिंकली आहेत. आता वंदे भारत मेट्रोची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लूक पण समोर आला आहे. कशी आहे ही मेट्रो, काय आहेत तिची वैशिष्ट्ये?

कुठे तयार होत आहे मेट्रो?

वंदे भारत मेट्रोविषयी जनतेत उत्सुकता आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे कॉम्पॅक्ट व्हर्झन पंजाबमधील कपूरथला येथली रेल्वे कोच फॅक्टरीत सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या वंदे भारत मेट्रोचा ट्रायल रन जुलै 2024 पासून सुरु होणार आहे. PTI या वृत्तसंस्थेनुसार, अत्यंत वाजवी किंमतीत प्रवाशांना आरामदायक सुविधा तर मिळतीलच, पण जलद प्रवासाच अनुभव घेता येईल. ही मेट्रो इंटर सिटी आणि इंट्रा सिटींमध्ये धावणार आहे. जुलै 2024 पासून वंदे भारत मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. लवकरात लवकर ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार असल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे.

असा आहे लूक

काय आहे वंदे मेट्रो?

वंदे मेट्रो, सध्या लोकप्रिय ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे कॉम्पॅक्ट मॉडल आहे. प्रत्येक दिवशी एकाच शहरात अथवा दोन शहरात लागणारा वेळ कमी करण्यासाठी ही मेट्रो उपयोगात येणार आहे. त्यासाठी तिचे खास डिझाईन तयार करण्यात आले आहे. ही मेट्रो ताशी 130 किलोमीटर वेगाने धावू शकते. मेट्रो नेटवर्क देशातील 100-125 किलोमीटर अंतरावरील जवळपास 124 शहरांना कनेक्ट करणार आहे.

कशी असेल मेट्रो?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोमध्ये युनिक कोच कॉन्फिगरेशन आहे. चार कोच एका युनिटसारखे काम करतील. एक मेट्रो ट्रेनमध्ये कमीत कमी 12 कोच असतील. या 12 कोचसह वंदे मेट्रोची सुरुवात होईल. प्रवाशांचा प्रतिसाद, गर्दी आणि मागणी पाहून हे 16 कोचपर्यंत ही संख्या वाढविण्यात येऊ शकते. ही मेट्रो कमी कालावधीत जास्त अंतर कापणार आहे. आता ट्रायल रनमध्ये वंदे भारत मेट्रोचा दमखम दिसून येईल. त्यानंतर ही मेट्रो देशभरात सुरु करण्यात येणार आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.