एकाच मतदार संघातून तिसऱ्यांदा अर्ज भरणारे MODI बनले तिसरे पंतप्रधान, याआधी कोणी केला हा विक्रम?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी येथून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा विक्रम केला आहे. काय आहे का प्रकार ?

एकाच मतदार संघातून तिसऱ्यांदा अर्ज भरणारे MODI बनले तिसरे पंतप्रधान, याआधी कोणी केला हा विक्रम?
PM ModiImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 6:41 PM

18 व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूकांचा धडाका सुरु आहे. लोकसभेचे चार टप्पे पार पडले आहेत. आता पाचवा टप्प्याचे मतदान येत्या 20 मे रोजी मुंबई सह अन्य राज्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिसऱ्यांदा वाराणसी येथून लोकसभेसाठी अर्ज भरला आहे. या प्रसंगी गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यातून एक नवा विक्रम झाला आहे. एका लोकसभा जागेसाठी तिसऱ्यांदा अर्ज भरणारे ते तिसरे पंतप्रधान बनले आहेत. आतापर्यंत कोणी-कोणी हा विक्रम केला आहे हे पाहणे पाहूयात…

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदार संघातून सलग तीन वेळा खासदार झाले होते आणि पंतप्रधान झाले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पंडित नेहरु यांनी फुलपूर मतदार संघाला आपला मतदार संघ बनविला होता आणि निवडणूका जिंकल्या होत्या. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या मतदार संघातून 1952, 1957 आणि 1962 मध्ये निवडणूका जिंकल्या होत्या. या लोकसभा मतदार संघातून भाजपाला नेहमीच कॉंग्रेसकडून जोरदार टक्कर मिळायची.

अटल बिहारी वाजपेयी

भाजपाचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर देखील हा रेकॉर्ड नोंदविलेला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ लोकसभा मतदार संघातून सुरुवातीला कॉंग्रेस पक्षाचा दबदबा होता. परंतू, साल 1991 नंतर सत्तेचे समीकरण बदलले. आणि भाजपाने या जागेवर ताबा मिळविला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाने साल 1991 मध्ये रंजित सिंह यांना उतरविले होते. आणि साल 1996 मध्ये राज बब्बर यांना संधी दिली होती. साल 1998 मध्ये मुझफ्फर अली, साल 1999 मध्ये कर्ण सिंह आणि 2004 मध्ये डॉ. मधु गुप्ता यांना उमेदवार बनविले होते. परंतू अटलबिहारी वाजपेयी यांनी त्या सर्वांवर मात करीत विजयी झाले आणि एकदा नव्हे तर पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यापैकी तीन वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला.

सर्वाधिक पंतप्रधान उत्तर प्रदेशातून

देशात आतापर्यंत 14 पंतप्रधान झाले आहेत. परंतू सर्वाधिक जास्त पंतप्रधान उत्तर प्रदेशाने दिले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिला पंतप्रधान बनण्याचे मान मिळालेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचा संबंध उत्तर प्रदेशाशी आहे. नेहरुंनी फुलपूर लोकसभा मतदार संघातून विजय मिळविला होता. परंतू साल 1962 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

लाल बहादूर शास्री अलाहाबाद मतदार संघातून संसदेत पोहचले आणि देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे निधन झाल्यानंतर लाल बहादूर शास्री हे देशाचे पंतप्रधान झाले. पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांची कन्या इंदिरा गांधी साल 1966 पहिल्यांदा देशाची पंतप्रधान झाली. त्यावेळी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांचा पहिला कार्यकाळ 14 महिन्यांचा होता. त्यानंतर 24 जानेवारी 1966 पासून ते 4 मार्च 1967 पर्यंत त्या पंतप्रधान पदावर राहिल्या. त्यानंतर साल 1967 नंतर लोकसभा निवडणूकीत इंदिरा गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्या आणि पंतप्रधान झाल्या.

उत्तर प्रदेशातील मेरठचे रहिवासी भारतरत्न चौधरी चरण सिंह हे देशाचे पाचवे पंतप्रधान झाले होते. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत चौधरी चरण सिंग उत्तर प्रदेशातील बागपत मतदारसंघातून भारतीय लोक दल पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले. आणि पंतप्रधान बनले. इंदिरा गांधी यांचे पूत्र राजीव गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 असा राजीव गांधी यांचा काळ होता.

राजीव गांधी यांच्या निधनानंतर विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे पंतप्रधान झाले. ते उत्तर प्रदेशातील फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. व्ही.पी. सिंह 2 डिसेंबर 1989 ते 10 डिसेंबर 1990 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. देशाचे 11 वे पंतप्रधान चंद्रशेखर 1989 मध्ये उत्तर प्रदेशच्या बलिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले. अटलबिहारी वाजपेयी यांना तीन वेळा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली. यानंतर ते पंतप्रधान झाले.

सर्वाधिक काळ पंतप्रधान नेहरु

नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा केवळ तीन जणांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ जास्त आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग हे तिघेही काँग्रेसचे नेते होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. नेहरू 16 वर्षे 9 महिने आणि 12 दिवस पंतप्रधान होते. नेहरु यांच्यानंतर त्यांची कन्या इंदिरा गांधी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम पाहीले. इंदिरा एकूण 15 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवस ( दोन काळाच्या टर्म मध्ये ) पंतप्रधान राहील्या. सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्यात तिसऱ्या क्रमांकावर मनमोहन सिंग आहेत. मनमोहन 10 वर्षे 4 दिवस सलग पंतप्रधान राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 वर्षे 350 दिवस पंतप्रधान पदावर आहेत. पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते मनमोहन यांचा विक्रम मोडू शकतात.

Non Stop LIVE Update
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण...
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण....
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?.
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात..
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात...
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?.
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट.
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल.
मुंबईकरांनो... महत्त्वाची बातमी, 'या' भागात आज 14 तास पाणी राहणार बंद
मुंबईकरांनो... महत्त्वाची बातमी, 'या' भागात आज 14 तास पाणी राहणार बंद.
भुजबळांच जागांसाठीचं बळ कुणासाठी? निकालाआधीच विधानसभेच्या जागांचा वाद
भुजबळांच जागांसाठीचं बळ कुणासाठी? निकालाआधीच विधानसभेच्या जागांचा वाद.
मोदीच पुन्हा पंतप्रधान? अजित दादांमुळे निकालाआधीच 10 जून तारीख चर्चेत
मोदीच पुन्हा पंतप्रधान? अजित दादांमुळे निकालाआधीच 10 जून तारीख चर्चेत.
पुण्यातील पब बार टार्गेटवर, शहाणे समजता? लाज वाटत नाही, धंगेकर भडकले
पुण्यातील पब बार टार्गेटवर, शहाणे समजता? लाज वाटत नाही, धंगेकर भडकले.