सरकारच्या एका होकाराने ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार, वेदांताकडून ‘ही’ ऑफर

वेदांता उद्योग समुहाने सरकारला एक मोठी ऑफिर दिलीय. त्यावर सरकारने होकार दिल्यास देशातील ऑक्सिजनचा प्रश्न सुटण्याची चिन्हं आहेत.

सरकारच्या एका होकाराने ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार, वेदांताकडून 'ही' ऑफर
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 11:02 PM

नवी दिल्ली : देशभरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. अगदी रेमडेसिवीरपासून ऑक्सिजनपर्यंत कमतरता तयार झालीय. अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि योग्य औषधांविना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यावरच आता वेदांता उद्योग समुहाने सरकारला एक मोठी ऑफिर दिलीय. त्यावर सरकारने होकार दिल्यास देशातील ऑक्सिजनचा प्रश्न सुटण्याची चिन्हं आहेत (Vedanta Group offer free of cost oxygen for corona patient in India know all about it).

वेदांता समुहाच्या हिंदुस्‍तान झिंक लिमिटेड आणि ईएसएल कंपन्यांनी वेदांता केअर नावाने एक उपक्रम सुरु केलाय. त्या अंतर्गत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वेदांताने आपलं ऑक्सिजन उत्पादन वाढवलं आहे. कंपनीने म्हटलं आहे, “स्टरलाईट कॉपरकडे तुतीकोरन येथे देशातील सर्वात मोठं उत्पादन केंद्र आहे. आम्ही तामिळनाडू आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे येथे मोठा ऑक्सिजन उत्पादन करणारा प्रकल्प सुरु करण्याची परवानगी मागितली आहे. या ठिकाणी दर दिवशी 1000 टन ऑक्सिनज निर्मिती होईल आणि देशातील ऑक्सिजनची कमतरता भरुन निघेल.”

सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल

विशेष म्हणजे ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाला परवानगी मागण्यासोबतच वेदांताने याबाबत सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केलीय. त्यावर शुक्रवारी (23 एप्रिल) सुनावणी होणार आहे.

दरम्यान, हिंदुस्थान झिंकने उदयपूर आरोग्य विभागाला 1500 लिटर ऑक्सिजन उपलब्ध करुन दिलाय. कंपनीने म्हटलंय की सध्या प्रतिदिन 5 टन वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय. याशिवाय कंपनी 2-3 टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

वेदांता प्रतिदिन 1000 टन ऑक्सिजन रुग्णांना मोफत उपलब्ध करुन देणार

वेदांता ग्रुपचे सीईओ सुनील दुग्गल म्हणाले, “देशात सध्या वैद्यकीय ऑक्सिजनची खूप कमतरता आहे. आमची कंपनी हा ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. वेदांता समुहाच्या हिंदुस्थान झिंक आणि ईएसएल या कंपन्यांनी आधीच वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केलीय. आता स्टरलाईट कॉपरने तुतीकोरन येथे प्रतिदिन 1000 टन ऑक्सिजन प्रकल्प सुरु करण्याची परवानगी मागितली आहे. हा ऑक्सिजन रुग्णांना मोफत उपलब्ध करुन दिला जाईल.”

हेही वाचा :

कोरोनाविरुद्धची ही लढाई मोठी, 100 वर्षातलं मोठं आरोग्य संकट, एकत्र येऊन लढू; रेमडेसिव्हीरवरुन राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र

Oxygen Man | त्यानं 23 लाखाची गाडी विकली अन् कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवले, मुंबईच्या देवदूताची प्रेरणादायी कहाणी

VIDEO | हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पण बेडच नाही, नाशिकमध्ये पत्नीच्या मांडीवरच पतीने प्राण सोडले

व्हिडीओ पाहा :

Vedanta Group offer free of cost oxygen for corona patient in India know all about it

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.