Video : राजस्थानमध्ये दिवसाढवळ्या भररस्त्यात डॉक्टर दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या!

शुक्रवारी दोन अज्ञात बाईकस्वारांनी कारमधून जात असलेल्या डॉक्टर दाम्पत्याची दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केलीय.

Video : राजस्थानमध्ये दिवसाढवळ्या भररस्त्यात डॉक्टर दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या!
राजस्थानच्या भरतपूरमध्ये दिवसाढवळ्या डॉक्टर दाम्पत्याची हत्या

भरतपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात अटलबंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी दोन अज्ञात बाईकस्वारांनी कारमधून जात असलेल्या डॉक्टर दाम्पत्याची दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केलीय. भरतपूर पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना कुमार खमेसरा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची ओळख पटवण्यात आलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या करण्यात आलेले डॉ. सुदीप गुप्ता, त्यांची पत्नी डॉ. सीमा गुप्ता आणि त्यांच्या आईला एक महिला आणि तिच्या 5 वर्षाच्या मुलाच्या हत्ये प्रकरणी शिक्षा झाली होती. (Doctor couple shot dead in Bharatpur, Rajasthan)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर दाम्पत्याची हत्या करणाऱ्या आरोपींची ओळख अनुज आणि महेश यांच्या रुपात करण्यात आलीय. नोव्हेंबर 2019 मध्ये ज्या महिलेची हत्या झाली होती, तिच्या भावानेच डॉक्टर दाम्पत्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या केलीय. या दोन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. हे दोन्ही आरोपी एका बाईकवरुन सर्क्युलर रोडवर केंद्रीय बस स्टँडजवळ सुदीप गुप्ता आणि सीमा गुप्ता यांची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

2 वर्षांपूर्वी डॉक्टरची पत्नी आणि आईकडून डॉक्टरच्या प्रेयसीची हत्या

नोव्हेंबर 2019 मध्ये एका घराला आग लागून एक महिला आणि तिच्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. हत्या झालेले डॉक्टर सुदीप गुप्ता यांचे त्या महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. डॉ. सीमा गुप्ता यांच्यावर आरोप होता की त्यांनी दोन वर्षापूर्वी पती सुदीप गुप्ताची प्रयेसी दीपा गुर्जर आणि त्यांच्या मुलाला जाळून ठार मारलं होतं. डॉ. सुदीप गुप्ता आणि त्यांची पत्नी सीमा भरतपूर शहरात राहत होते. डॉक्टर दाम्पत्याने सूर्या सिटीसारख्या पॉश भागात एक घर खरेदी केल होतं. या घरामध्ये डॉक्टर आपली कथित प्रेमिया दीपा गुर्जर हिला ठेवू लागला. दीपा ही डॉ. सुदीपच्या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट होती असं सांगितलं जात आहे.

डॉ. सुदीप यांनी आपली पत्नी डॉ. सीमा हिला सांगितलं की ते घर एका बँक मॅनेजरला भाड्याने दिलं आहे. पण मयत दीपा या घरात 1 नोव्हेंबर 2019 ला पार्लर सुरु करणार होती. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत डॉ. सुदीप यांचं नाव दिल्यानंतर पत्नी सीमा यांना आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल संशल आला होता.

इतर बातम्या :

19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !

नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण, आईने मुलांना पाण्यात फेकून दिलं, लहानग्यांचा बुडून मृत्यू

Doctor couple shot dead in Bharatpur, Rajasthan