भारतातील असं एक गाव जिथे महिला कपडेच घालत नाहीत, कारण खूपच धक्कादायक, ..तर त्यांना वाटते भीती
भारत हा विविधतेमध्ये एकदा असलेला देश आहे, भारतामध्ये शकडो प्रकारच्या प्रथा पंरपरांच पालन केलं जातं, मात्र अशा देखील काही प्रथा असतात ज्या चर्चेमध्ये येतात, अशाच एका प्रथेबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

भारतामध्ये अनेक धर्माचे आणि शेकडो जातीचे लोक राहतात, प्रत्येकाच्या प्रथा परंपरा देखील वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जण आपल्या प्रथा परंपराचं पालन करत असतो, यातील काही प्रथा परंपरांना शेकडो -हजारो वर्षांचा इतिहास असतो, त्यामागे काही विशिष्ट कारणं असतात. तेथील लोकांच्या काही धारणा आणि श्रद्धा असतात. भारतामध्ये अशा काही परंपरा आहे, त्या परंपरा या त्या राज्यातील तेथील निसर्गाशी एकरूप झाल्या आहेत. अनेक यात्रा उत्सव असतात, सण असतात, असे काही सण असतात ज्याद्वारे आपण आभार व्यक्त करत असतो, उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रात पोळा नावाच सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, वर्षभर शेतकऱ्यांसाठी बैल शेतात राब-राब राबतो. मात्र पोळा असा एकच दिवस असतो, ज्या दिवशी बळी राजा बैलांचे आभार मानतो, तो त्या दिवशी बैलांना पोळी खाऊ घालतो, त्यांना कामाला लावत नाही. त्यांची पूजा करतो, गावातून त्यांची मिरवणूक काढतो. त्याचप्रमाणे निसर्गाच्या साखळीमध्ये सापाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे महाराष्ट्रात नागपंचमी सारखा सण सुद्ध मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. हा सण साजरा करण्यामागे उद्देश हा आहे की, या सणाला प्रत्येक सासुरवासीन महिला आपल्या माहेरी येते.
अशा अनेक प्रथा पंरपरा आहेत ज्या देशभरात साजऱ्या केल्या जातात, मात्र अशा देखील देशात काही विचित्र प्रथा परंपरा आहे, ज्याची चर्चा कायम होत असते अशा एका प्रथेबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ही प्रथा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातल्या पिणी गावात पाळली जाते, या गावात दरवर्षी पाच दिवसांचा अनोखा उत्सव असतो, या काळात महिला कपडेच परिधान करत नाहीत. या पाच दिवसांच्या काळात महिला घराबाहेर देखील पडत नाहीत, तसेच पतीशी संवाद देखील साधत नाहीत. या काळात त्यांच्या पतीला घरात प्रवेश नसतो. या काळात पुरुषांनी संयमाचे पालन करावे लागते. या काळात पतीला मद्यपान किंवा मांसाहार करता येत नाही. जर या काळात कोणी मांसहार केला तर व्रत मोडल्याचं मानलं जातं.
श्रावण महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये ही प्रथा या गावात साजरी केली जाते. येथील लोकांचा असा विश्वास आहे की, जर कोणी प्रथा मोडली तर गावावर मोठं संकट येऊ शकतं, त्यामुळे गावतील कोणी देखील ही प्रथा मोडत नाही. ही प्रथा लाहू घोंडा देवतेच्या नावाने सुरू झाली आहे, असं मानतात. पूर्वी गावावर वारंवार राक्षस हल्ला करत असत, या देवतेनं राक्षसाचा वध केला, तेव्हापासून ही प्रथा सुरू झाल्याचा दावा करण्यात येतो.
