AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! भाजप जिंकूनही पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाही? ममता बॅनर्जींनी मारली मेख, आता राज्यपालांकडे पर्याय काय?

West Bengal Political Crisis : ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बंगालमध्ये संवैधानिक संकटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता राज्यपालांसमोरील पर्याय काय आहेत ते जाणून घेऊयात.

सर्वात मोठी बातमी ! भाजप जिंकूनही पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाही? ममता बॅनर्जींनी मारली मेख, आता राज्यपालांकडे पर्याय काय?
Mamata and ModiImage Credit source: Google
| Updated on: May 05, 2026 | 6:29 PM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. अशातच आज ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बंगालमध्ये संवैधानिक संकटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्यपालांसमोर नेमके काय पर्याय आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ममता बॅनर्जी यांचा राजीनामा देण्यास नकार

पत्रकार परिषदेत राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. नैतिकदृष्ट्या आमचा विजय झाला आहे. मी राजभवनात जाऊन राजीनामा देणार नाही. आता पुढील रणनीतीबाबत पक्षाच्या सदस्यांसोबत चर्चा केली जाईल. मी आता भाजपाच्या अत्याचारांना अधिक सहन करणार नाही. मी रस्त्यावर उतरून लढा देईन. पुढे बोलताना त्यांनी आमचा सामना भाजपाशी नव्हता, तर निवडणूक आयोगाशी होता आणि आयोगाने भाजपासाठी काम केले असा गंभीर आरोप केला आहे.

राज्यपालांसमोर काय पर्याय?

आता ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेमुळे राज्यात संवैधानिक पेच निर्माण होऊ शकतो. मात्र, सरकार स्थापनेवर त्याचा थेट परिणाम होणार नाही. वरिष्ठ वकील शेखर नाफडे यांनी सांगितले की, जर ममता यांनी राजीनामा देण्यास नकार दिला, तर संविधानानुसार राज्यपाल त्यांचे सरकार बरखास्त करू शकतात, कारण निवडणूक आयोगाने आवश्यक अधिसूचना आणि जनादेश जारी केला आहे. निवडणूक निकालांना आव्हान देण्याचा ममता अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. मात्र, न्यायालयाकडून आदेश येईपर्यंत त्यांना निवडणूक आयोगाच्या जनादेशाचे पालन करावे लागेल.

बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 7 मे रोजी संपणार

शेखर नाफडे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘विधानसभा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतात. पश्चिम बंगालच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 7 मे 2026 रोजी संपत आहे. सध्या आर. एन. रवी हे बंगालचे राज्यपाल आहेत. ते 7 तारखेनंतर सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना भेटून राजीनामा दिला नाही तरी काही फरक पडणार नाही.

सत्ता स्थापन करण्यास अडथळा नाही

तसेच जर मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील, तर राज्यपाल त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला देऊ शकतात. तरीही त्यांनी नकार दिल्यास राज्यपाल त्यांना पदावरून काढू शकतात. तसेच राज्यपाल विद्यमान मुख्यमंत्र्यांचा राजीनामा न घेता देखील नव्या विधानसभेत नवीन मुख्यमंत्री नियुक्त करू शकतात. कारण कार्यकाळाच्या मध्यात मुख्यमंत्री बदलण्यास काही संवैधानिक अडचणी असतात, मात्र कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नवीन विधानसभा स्थापन करण्यास अडथळा येत नाही. निवडणूक आयोगाने ज्यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले आहे, तेच वैध मानले जातील. त्यामुळे आगामी काळात भाजपचा मुख्यमंत्री बनण्यास काहीही अडचण येणार नाही.

Follow Us
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...