WITT : कंगना राणावत काय बोलणार? भाषणाकडे लक्ष, WITTमध्ये आज सितारों की मैफील
टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे. आज या कॉन्क्लेव्हचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या सोहळ्याला संबोधित करणार आहेत. तसेच आज दिवसभर चालणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही संवाद साधणार आहेत. यावेळी अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता आयुष्यमान खुराणा यावेळी संवाद साधणार आहेत.

नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : देशातील नंबर वन नेटवर्क टीव्ही9 नेटवर्कने देशातील मेगा इव्हेंट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या सोहळ्याला संबोधित करणार आहेत. तसेच आज दिवसभर चालणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही संवाद साधणार आहेत. अभिनेत्री कंगना राणावतही आज संवाद साधणार आहे. त्यामुळे कंगना आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या कालच्या मंचावर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री रवीना टंडन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासारख्या दिग्गजांनी आपला अनुभव कथन केला. त्याशिवाय सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रवीना टंडन यांच्यासह एकूण 8 जणांना नक्षत्र सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं. आज कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेता आयुष्यमान खुराना आणि कंगना राणावत या समीटमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी दोघेही आपले विचार मांडणार आहेत.
कंगना काय बोलणार?
बॉलिवूड क्वीन कंगना राणावतही आजच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. फायरसाईड चॅट- क्रिएटिव्हिटी : वर्ल्ड इज माय ओएस्टर या सेगमेंटमध्ये कंगना भाग घेणारआहे. या सेगमेंटची सुरूवात संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी ती रचनात्मक गोष्टींवर भाष्य करणार आहे. क्रिएटिव्हिटीच्या बाबत ती मार्गदर्शन करणार आहे. कंगना गेल्या दोन दशकापासून फिल्म इंडिस्ट्रीत आहे. आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर कंगनाने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले आहेत. सध्या तिने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. एमर्जन्सी या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचं ती दिग्दर्शनही करणार आहे. कंगना नेहमीच तिच्या रोखठोक भूमिकांमुळे चर्चेत असते. तसेच सोशल मीडियावरही ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
आयुष्यमान खुरानाही येणार
आज दुपारी 1.20 वाजताच्या सेगमेंटमध्ये अभिनेता आयुष्यमान खुराना सामील होणार आहे. फायरसाइड चॅट- सिनेमा फॉर न्यू इंडिया या सेगमेंटमध्ये आयुष्यमान खुराना दिसणार आहे. यावेळी आयुष्यमान खुराना सिनेमाच्या नव्या युगावर भाष्य करणार आहे. आयुष्यमान खुराना गेल्या 12 वर्षापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आयुष्यमानने त्याच्या करिअरमध्ये फिल्मफेयर आणि नॅशनल अॅवार्ड जिंकले आहेत. गेल्यावेळी तो ड्रीम गर्ल-2 मध्ये दिसला होता. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. आयुष्यमान एक चांगला गायकही आहे.
