AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : ज्येष्ठ लेखक विक्रम संपत मांडणार भारतीय इतिहासाचा नवा दृष्टिकोन

विक्रम संपत हे प्रसिद्ध इतिहासकार असण्यासोबतच एक प्रसिद्ध लेखक देखील आहेत. कर्नाटकात जन्मलेल्या विक्रम संपत यांनी आपल्या लेखणीतून देशात आणि जगात विशेष स्थान निर्माण केले आहे. गौहर जान आणि विनायक दामोदर सावरकर यांची चरित्रे लिहिली. त्यांच्या पुस्तकांना देशात आणि जगभरात विशेष पसंती मिळाली.

What India Thinks Today : ज्येष्ठ लेखक विक्रम संपत मांडणार भारतीय इतिहासाचा नवा दृष्टिकोन
लेखक विक्रम संपत Image Credit source: tv9 Network
| Updated on: Feb 25, 2024 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली : देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 पुन्हा एकदा व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) ग्लोबल समिटसाठी सज्ज आहे. 25 फेब्रुवारीपासून अशोका हॉटेल, दिल्ली येथे या समिटचे आयोजन करण्यात येणार आहे. शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक विक्रम संपत हे भारतीय इतिहास आणि पाश्चात्य सभ्यता यावर आपले विचार मांडतील.  इतिहासकार विक्रम संपत भारतीय इतिहास, पाश्चात्य सभ्यता आणि जग, अनुच्छेद 370 बद्दल दृष्टिकोन आहे यावर आपले विचार मांडतील. या विषयावरील अनेक प्रश्नांची उत्तरे देतील आणि आपले मतही मांडतील.

साहित्य अकादमी युवा पुरस्काराने सन्मानित

विक्रम संपत हे प्रसिद्ध इतिहासकार असण्यासोबतच एक प्रसिद्ध लेखक देखील आहेत. कर्नाटकात जन्मलेल्या विक्रम संपत यांनी आपल्या लेखणीतून देशात आणि जगात विशेष स्थान निर्माण केले आहे. गौहर जान आणि विनायक दामोदर सावरकर यांची चरित्रे लिहिली. त्यांच्या पुस्तकांना देशात आणि जगभरात विशेष पसंती मिळाली. वीर सावरकरांवर लिहिलेले चरित्र राष्ट्रीय बेस्ट सेलर होते. विक्रम संपत यांच्या पुस्तकांचे समीक्षकांनीही कौतुक केले आहे.

फायनान्स क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गुरुग्राम आणि बंगळुरूच्या फायनान्स कंपन्या आणि बँकांमध्ये सेवा दिली. नंतर हेवलेट-पॅकार्ड (HP) मध्ये सामील झाले. बँकिंग क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी लेखन क्षेत्रात प्रवेश केला.

ते रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो राहिले आहेत. आयझेनहॉवर आणि अस्पेन ग्लोबल फेलो आणि NMML वर वरिष्ठ संशोधन फेलो म्हणून काम केले आहे. विक्रम संपत यांना साहित्य अकादमीचा इंग्रजी साहित्यासाठीचा पहिला युवा पुरस्कार आणि ऐतिहासिक संशोधनातील उत्कृष्टतेसाठी ARSC पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

2013 मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि क्वीन्सलँड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. 2019 आणि 2021 मध्ये त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र दोन भागात लिहिले. 2021 मध्ये त्यांची रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. आपल्या लेखणीतून ते जगभरात भारताचा गौरव करत आहेत.

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.