AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन 2 : लग्न समारंभ आणि मद्यविक्रीबाबत सरकारचा निर्णय काय? गृहमंत्रालयाची गाईडलाईन…

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे (Lockdown 2 Home ministry guidelines).

लॉकडाऊन 2 : लग्न समारंभ आणि मद्यविक्रीबाबत सरकारचा निर्णय काय? गृहमंत्रालयाची गाईडलाईन...
| Updated on: Apr 15, 2020 | 6:11 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली (Lockdown 2 Home ministry guidelines). लॉकडाऊनमुळे गेल्या 21 दिवसांत अनेक लग्न समारंभ स्थगित करण्यात आले. याशिवाव मद्यविक्रीचे दुकानेदेखील बंद होते. त्यामुळे ‘लॉकडाऊन 2’च्या काळात लग्न समारंभ आणि मद्यविक्रीच्या दुकानांबाबत केंद्र सरकारने काय निर्णय घेतला आहे? अला सवाल देशभरातील अनेक लोकांना पडत आहे (Lockdown 2 Home ministry guidelines).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (14 एप्रिल) ‘लॉकडाऊन 2’ची घोषणा केली. मात्र, हा महिना सध्या लग्न सराईतचा आहे. या महिन्यात अनेकांचे लग्न ठरते. त्यामुळे या गोष्टीचा विचार करुन लग्न समारंभासाठी काही नियमावली सरकारने बनवली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, गृह मंत्रालयाच्या ‘लॉकडाऊन 2’च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अर्थात गाईडलाईनमध्ये देशातील सर्व लग्नाचे हॉल बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 3 मेपर्यंत एकही लग्न समारंभ पार पडणार नाही.

दुसरीकडे केंद्र सरकारने मद्यविक्रीच्या सर्व दुकानांवर 3 मेपर्यंत बंदी ठेवली आहे. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मद्यविक्री, गुटखा, तंबाखू इत्यादींवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 3 मेपर्यंत देशातील सर्व मद्यविक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत.

‘लॉकडाऊन 2’च्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी गृह मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध असेल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज, खासगी कोचिंग क्लासेस, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे सेवा बंद ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

संबंधित बातम्या :

Lockdown : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत, घरात दारु कशी बनवावी?, गुगलवर ट्रेंड

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.