AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे देण्याची पाळी आली तर मुइज्जूंची फुशारकी मावळली, पाहा मालदीवने भारताला काय केली विनंती?

भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. याला कारण आहेत सत्तेत आलेले नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू. जे चीनला खूश करण्यासाठी भारतासोबत पंगा घेत आहेत. पण असं असताना देखील भारताने नेहमीच शेजाऱ्यांची मदत केली आहे. एकीकडे हेकडी दाखवणाऱ्या मुइज्जू यांना पुन्हा भारताला विनंती करण्याची वेळ आली आहे.

पैसे देण्याची पाळी आली तर मुइज्जूंची फुशारकी मावळली, पाहा मालदीवने भारताला काय केली विनंती?
india maldive row
| Updated on: Apr 13, 2024 | 7:07 PM
Share

India maldive row : भारत आणि मालदीव संबंध ताणले गेल्यानंतर आता मालदीव सरकार भारतापुढे मवाळ भूमिका घेताना दिसत आहे. आधी भारतातून होत असलेली निर्यात सुरु ठेवण्याची विंनती भारताने मान्य केल्यानंतर आता मालदीवला अनेक महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा सुरुच राहणार आहे.  दुसरीकडे आता मालदीव आणखी एका गोष्टीसाठी भारतासोबत चर्चेत गुंतला आहे. मालदीवची इच्छा आहे की भारताने त्याच्या आयातीचा खर्च स्थानिक चलन रुफियामध्ये करावा. मालदीव दरवर्षी भारताकडून ७८० दशलक्ष डॉलर आणि चीनमधून 720 दशलक्ष डॉलर किमतीचा माल आयात करतो. त्यामुळे आता यासाठी मालदीव भारताला विनंती करत आहे.

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात बिघडले आहेत. कारण मालदीवमध्ये सत्तेत आलेले मोहम्मद मुइज्जू जे चीन समर्थक आहेत. ते सतत भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. आधी भारतील सैन्याला मालदीवमधून जाण्यास सांगितल्यानंतर आता भारताने देखील आपल्या सैन्याला माघारी बोलवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. चीनच्या मांडीवर बसून भारताविरुद्ध रणनीती बनणारे मुइज्जू यांना भारताकडून मदतीची अपेक्षा आहे.

मालदीवचे अर्थमंत्री मोहम्मद सईद यांनी सांगितले की, एका व्यवस्थेवर काम केले जात आहे. मालदीवला भारताला स्थानिक चलनात रुफियामध्ये पैसे देण्याचा पर्याय हवा आहे. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे.

मालदीवला स्थानिक चलनात पैसे का हवे आहेत?

स्थानिक चलनात व्यवहार करता आला तर त्याचा देशाला फायदा होता. कारण डॉलरमध्ये व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अमेरिकासारख्या देश श्रीमंत होतात. डॉलरचा दर अधिकृत बाजार मूल्यांमध्ये परत आणण्यास सक्षम असेल.

सईद म्हणाले की, सर्व प्रमुख आयात व्यवस्थेच्या संदर्भात डॉलर-लेस पेमेंट सिस्टमच्या शक्यतेवर काम केले जात आहे. स्थानिक चलनात दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापार फायदेशीर आहे. त्यामुळे एकमेकांच्या परकीय चलनाच्या साठ्याची बचत होण्यास मदत होते. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यवहारातील अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वावर मात करण्याच्या दिशेने हे पाऊल मोठे पाऊल ठरेल.

भारताची भूमिका काय?

सईद म्हणाले की, जुलै 2023 मध्ये, भारत सरकारने घोषित केले होते की स्थानिक चलनांमध्ये द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रिझव्र्ह बँकेने विशेष रुपे व्होस्ट्रो खाती (SRVA) उघडण्यास मान्यता दिलेल्या 22 देशांपैकी मालदीव एक आहे. भारतातून आयात केलेल्या वस्तूंचे पैसे मालदीवच्या रुफियामध्ये मिळू शकतील याची खात्री करणे हा त्याचा उद्देश होता. मालदीव हा इतर कोणत्याही देशाशी संबंध तोडणारा देश नाही. आम्ही व्यवसायासाठी खुला असलेला देश आहोत.

जरी आम्हाला संसदेत बहुमत मिळाले तरी मालदीव रुफिया डॉलरच्या तुलनेत 30 किंवा 40 टक्के मजबूत होईल, असे सईद म्हणाले. भविष्यात डॉलरचा दर MVR 15.42 च्या खाली जाईल. मालदीवने चीनच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरला मालदीवला भेट देण्याचे निमंत्रण दिल्याचेही मंत्र्यांनी उघड केले. दोन्ही देशांमध्ये चलन अदलाबदल करारावर स्वाक्षरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.