नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली; कोण आहेत प्रीती पटेल?, वाचा सविस्तर

भारतातील महाघोटाळेबाज नीरव मोदीचं प्रत्यार्पण करण्यास ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मंजुरी दिली आहे. (who is britain home minister priti patel? who signed nirav modi extradition case)

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली; कोण आहेत प्रीती पटेल?, वाचा सविस्तर
Priti Patel
भीमराव गवळी

|

Apr 17, 2021 | 10:30 AM

नवी दिल्ली: भारतातील महाघोटाळेबाज नीरव मोदीचं प्रत्यार्पण करण्यास ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मंजुरी दिली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत दौऱ्यापूर्वीच प्रीती यांनी प्रत्यार्पणाच्या कागदपत्रांवर सही केली आहे. भारतीय वंशाच्या प्रीती या ब्रिटनंचं सर्वात महत्त्वाचं आणि शक्तीशाली खातं सांभाळत आहेत. कोण आहेत या प्रीती पटेल? जाणून घेऊ या सविस्तर. (who is britain home minister priti patel? who signed nirav modi extradition case)

प्रीती पटेल या ब्रिटनमधील पहिल्या भारतीय महिला कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच त्या पहिल्या गुजराती महिला खासदार आहेत. ब्रिटीश राजकारणातील या अत्यंत महत्त्वाच्या पदावर पोहोचण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. 2016मध्ये त्या इंटरनॅशनल डेव्हल्पमेंट सेक्रेटरी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. जुलै 2019मध्ये 48 वर्षीय प्रीती यांना बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची सूत्रे सोपवली. ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाच्या पदावर पोहोचलेल्या त्या एकमेव भारतीय आहेत.

प्रीतींच्या हाती ब्रिटनची सुरक्षा

ब्रिटनमध्ये गृहमंत्रीपद हे तिसरे महत्त्वाचे पद असते. सर्वात मोठं पद म्हणजे पंतप्रधान पद, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय आणि नंतर गृहमंत्रीपद. गृहखात्याकडे देशाची सुरक्षा, गुन्हे, दहशथवाद आणि इमिग्रेशन आदी महत्त्वाची जबाबदारी असते. त्याशिवाय प्रीती यांना नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा निर्णयही घ्यायचा होता. प्रीती या एका वर्किंग क्लास कुटुंबातील आहेत. त्यांचे कुटुंबीय 20व्या शतकात गुजरातहून युगांडाला आले होते.

युनिव्हर्सिटी ऑफ अॅक्सेसमधून पदवी

युगांडामध्ये लष्करी राजवट होती. हुकूमशहा इदी अमीन यांच्या छळामुळे भारतीयांना युगांडा सोडावा लागला. त्यामुळे प्रीती यांचे वडील सुशील आणि आई अंजना यांनी युगांडा सोडून 1970मध्ये ब्रिटनमध्ये आले होते. ते हर्टफोर्डशायरमध्ये राहू लागले. याच ठिकाणी प्रीती यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांनी वेटफॉर्ड ग्रामर शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर त्या कील विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आल्या. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ अॅक्सेसमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

2010मध्ये पहिल्यांदा खासदार

प्रीती यांनी मार्केटिंग सल्लागार अॅलेक्स सॉयर यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना एक मुलगाही आहे. त्याचं नाव फ्रेडी आहे. 2010मध्ये प्रीती पहिल्यांदा खासदार बनल्या. त्यामुळे त्या राजकारणात सक्रिय झाल्याने त्यांच्यावर टीकाही झाली. नोव्हेंबर 2017मध्ये सुट्टीवर असताना इस्रायली मंत्र्यांसोबत बेकायदेशीरपणे बैठक आयोजित केल्याने त्यांना इंटरनॅशनल डेव्हल्पमेंट सेक्रेटरी पद गमवावं लागलं होतं. मार्गरेट थॅचर या त्यांच्या आदर्श आहेत. प्रीती या ब्रेग्झिटच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांनी विन्स्टन चर्चिल हे स्वातंत्र्याचे महान संरक्षक असल्याचं म्हटलं होतं. (who is britain home minister priti patel? who signed nirav modi extradition case)

संबंधित बातम्या:

PNB scam: महाघोटाळेबाज नीरव मोदीला भारतात आणणार; ब्रिटनने दिली प्रत्यार्पणास मंजुरी

‘जो बायडन सर, कळकळीची विनंती, लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवा’, अदर पुनावाला यांचे अमेरिकेच्या अध्यक्षांना विनवण्या

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, प्रकाश जावडेकरांनाही कोरोनाची लागण

(who is britain home minister priti patel? who signed nirav modi extradition case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें