Ayodhya Verdict: रामलल्ला कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाने जमिनीची मालकी कुणाला दिली?

सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (09 नोव्हेंबर) अनेक दशके रखडलेल्या अयोध्‍या रामजन्‍मभूमी-बाबरी मशीद वादावर आपला निर्णय दिला. न्यायालयाने या वादग्रस्त जमिनीचा हक्क रामलला विराजमान (Who is Ramlalla) या पक्षकाराला दिला आहे.

Ayodhya Verdict: रामलल्ला कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाने जमिनीची मालकी कुणाला दिली?

नवी दिल्‍ली: सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (09 नोव्हेंबर) अनेक दशके रखडलेल्या अयोध्‍या रामजन्‍मभूमी-बाबरी मशीद वादावर आपला निर्णय दिला. न्यायालयाने या वादग्रस्त जमिनीचा हक्क रामलला विराजमान (Who is Ramlalla) या पक्षकाराला दिला आहे. तसेच या जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेकांना रामलला विराजमान (Who is Ramlalla) नेमके कोण आहेत आणि न्यायालयाने त्यांना पक्षकार कसे मानले याविषयी प्रश्न पडला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विवादीत जमीन प्रकरणी निकाल देताना सर्व पक्षकारांचे दावे फेटाळत रामलला विराजमान यांना या जमिनीचा मालक म्हटले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वप्रथम रामलला विराजमान यांना पक्षकार म्हणून स्वीकारले

अयोध्‍येतील वादग्रस्त जमिनीवर रामलला विराजमान यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रामलला यांना पक्षकार मानन्यात हिंदू धर्माच्या मान्यतांचा आधार घेण्यात आला आहे. यानुसार प्राण प्रतिष्ठापना केलेल्या कोणत्याही मूर्तीला जीवंत समजले जाते. म्हणूनच रामलला यांच्या मूर्तीला जीवंत मानून त्यांना पक्षकार करण्यात आले. यात न्‍याय प्रक्रिया संहितेच्या कलम 32 चा संदर्भ देण्यात आला. ही मुर्ती प्रभू श्रीराम यांच्या बाल स्वरुपाची आहे. त्यामुळे मुर्तीला अल्पवयीन मानलं गेलं. रामलला विराजमान यांना जीवंत मानून त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही सांगण्यात आलं.

सर्वात आधी रामलला विराजमान यांना अलहाबाद उच्च न्यायालयाने पक्षकार मानलं. तसंच न्यायालयाने त्याच्यावतीनं मित्र म्हणून 1 जुलै 1989 ला देवकीनंदन अग्रवाल यांना खटला लढण्यास परवानगी दिली. जमिनीचा कायदेशीर वाद सुरू झाल्यानंतर देवकीनंदन अग्रवाल यांनी रामलला विराजमानच्यावतीने युक्तीवाद केला. देवकीनंदन स्वतः अलहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. त्यांनी रामलला यांची मूर्ती अल्पवयीन असल्यानं त्यांच्यावतीनं स्वतः खटला लढला.

देवकीनंदन यांनी रामलला यांच्यावतीने 1989 सांगितले, की रामलला यांनाही या प्रकरणी पक्षकार करावे. कारण वादग्रस्त इमारतीत स्वतः भगवान रामलला विराजमान आहेत.” अलहाबाद उच्च न्यायालयाने देवकीनंदन यांचा हा युक्तीवाद मान्य करत रामलला विराजमान यांना पक्षकार मानले. यानंतरच्या काळात अयोध्‍या विवादात रामलला विराजमान हे नेहमीच पक्षकार राहिले. सर्वोच्च न्यायालयात देखील रामलला विराजमानच्यावतीने आपली बाजू मांडण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयात रामलला यांच्यावतीने अॅड. के. पाराशरणांचा युक्तीवाद

देवकीनंदन अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर विश्‍व हिंदू परिषदेचे त्रिलोकी नाथ पांडेय यांनी रामलला विराजमानची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयात 2019 मध्ये 40 दिवसांपर्यंत चाललेल्या सुनावणीत वरिष्‍ठ वकील के. पाराशरण यांनी रामलला विराजमानच्यावतीने युक्तीवाद केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *