AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : हिमांशीने ऐशन्याकडून शिकावं….नौदल अधिकारी नरवाल यांच्या पत्नीला असे सल्ले का दिले जातायत?

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शुभम द्विवेदी यांची हत्या झाली. आता त्यांची पत्नी ऐशन्याच एक वक्तव्य व्हायरल झालं आहे. ऐशन्या म्हणाला की, माझे पती मुस्लिम असते, तर ते आज जिवंत असते. या वक्तव्यावरुन देशात हिंदू-मुस्लिम वादविवाद सुरु झाला आहे. अनेक लोक ऐशन्याच्या वक्तव्याच कौतुक करतायत. काही जण तिच्यावर टीका करत आहेत.

Pahalgam Terror Attack : हिमांशीने ऐशन्याकडून शिकावं....नौदल अधिकारी नरवाल यांच्या पत्नीला असे सल्ले का दिले जातायत?
pahalgam terror attack victims
| Updated on: May 03, 2025 | 10:20 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. यात एक शुभम द्विवेदी होते. दहशतवाद्यांनी शुभम यांची पत्नीसमोर गोळ्या घालून हत्या केली. सर्वसामान्य जनतेसह नेते मंडळी पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. शुभम यांच्या पत्नी म्हणाल्या की, ‘माझा नवरा मुस्लिम असता, तर तो आज जिवंत असता’ एका चॅनलला दिलेल्या त्यांच्या इंटरव्यूची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपवरुन लोक नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवालला ऐशान्याकडून शिकण्याचा सल्ला देत आहेत.

“जेव्हा लोक म्हणतात हिंदू-मुस्लिम एक आहेत, हे कानाखाली मारण्यासारखं आहे. दहशतवाद्यांनी हा विचार केला नाही. त्यांनी हिंदुंची हत्या केली. मुस्लिमांना वेगळं केलं. मुस्लिम सुरक्षितरित्या आपल्या घरी पोहोचले. आम्ही मुस्लिम असतो, तर आम्ही सुद्धा वाचलो असतो. आम्ही आता आमच्या घरी असतो. आमच्यासाठी भारतीय असणं जास्त महत्त्वाच होतं. आम्ही कधी धर्मावरुन भेदभाव केला नाही” असं ऐशन्या म्हणाली.

लोक हिमांशीला असा सल्ला का देतायत?

ऐशन्याच्या वक्तव्यानंतर लोकं नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवालला ऐशन्याकडून शिकण्याचा सल्ला देत आहेत. हिमांशीच्या एका वक्तव्यामुळे लोक तिला असा सल्ला देत आहेत. हिमांशीने मुस्लिम आणि काश्मिरीच्या मागे लागू नका असं आवाहन केलं होतं.

शुभमचा चेहरा रक्ताने माखलेला

ऐशन्या म्हणाला की, “मी कधी हिंदू-मुस्लिम फरक केला नाही. शुभमचे अनेक मुस्लिम मित्र आहेत. माझ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुस्लिम होते, पण आता आश्चर्य वाटतं” “जेव्हा दहशतवाद्यांनी विचारलं की, तुम्ही हिंदू आहात कि मुस्लिम? त्यावेळी मी हसली. मी विचारलं की काय चाललय. जेव्हा त्यांनी प्रश्न पुन्हा विचारला, त्यावेळी मी हिंदू असल्याच सांगितलं. त्यांनी लगेच गोळी चालवली. त्यावेळी माझ्यासाठी सगळं काही संपलं. शुभमचा चेहरा रक्ताने माखलेला” असं ऐशन्याने त्या भयानक अनुभवाबद्दल सांगितलं.

NIA च्या तपासात काय कळलय?

NIA ची टीम पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहे. हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानात रचण्यात आल्याच प्रारंभिक तपासातून समोर आलय. दहशतवाद्यांना काही स्थानिक लोकांनी मदत केल्याच सुद्धा तपासात दिसलय.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...