AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एक ज्योती मौर्य ? जमीन विकून पतीने शिकवले, पण लेखापाल बनताच पत्नीने मागितला घटस्फोट !

SDM Jyoti Maurya Case : बहुचर्चित Sdm महिला अधिकारी ज्योती मौर्य प्रकरण सध्या चांगलचं गाजतंय. त्याचप्रमाणे आणखी एक घटना समोर आली आहे, पत्नीच्या शिक्षणासाठी पतीने जमीनही विकली पण त्याच पत्नीला पद मिळताच पतीच्या त्यागाचा विसर पडला.

आणखी एक ज्योती मौर्य ?  जमीन विकून पतीने शिकवले, पण लेखापाल बनताच पत्नीने मागितला घटस्फोट !
| Updated on: Jul 31, 2023 | 11:11 AM
Share

लखनऊ | 31 जुलै 2023 : Sdm महिला अधिकारी ज्योती मौर्य (jyoti maurya ) यांचं प्रकरण सध्या चांगलचं चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. तेथे एक महिला पतीच्या मदतीने शिकली-सवरली, लेखपालही बनली. पण पद मिळताच तिला पतीच्या कष्टांचा, त्यागाचा विसर पडला आणि तिने पतीविरोधात आरोप लावक सरळ घटस्फोटाची (divorce) मागणी केली आहे. मात्र या खटल्याची सुनावणी करताना कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाया महिलेने पत्नीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा निराधार ठरवून फेटाळला.

याप्रकरणात त्या महिलेच्या पतीच्या सांगण्यानुसार, अभ्यासाची आवड पाहून त्याने पत्नीला पुढे शिकण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्याने त्याच्याकडील जमीन विकण्यासही मागेपुढे पाहिले नाही. अथक प्रयत्नांनंतर त्याच्या पत्नीची लेखपाल पदासाठी निवड झाली. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तिने पतीवर छळाचा आरोप करत घटस्फोटाची केस दाखल केली. पण कोर्टाने ती फेटाळली.

नक्की काय आहे हे प्रकरण ?

हे संपूर्ण प्रकरण बाराबंकी येथील मोहम्मदपूर मजरे गलहमाऊ गावातील आहे. येथे राहणाऱ्या अमरीश यांचे लग्न 20 फेब्रुवारी 2009 साली जैदपूर जवळील गावात राहणाऱ्या दीपिका हिच्याशी झाले होते. लग्नानंतर दीपिकाचे ग्रॅज्युएशन सासरीच पूर्ण झाले. अमरीश यांच्या सांगण्यानुसार, दीपिकाची अभ्यासाची आवड, त्यातील रस पाहून त्यांनी तिला एमए आणि बी.एड. करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग क्लासही लावला. तिला क्लासला सोडणे, परत आणणे यासोबतच अमरीश यांनी इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या.

यासाठी त्यांनी बराच खर्च केला, आर्थिक तंगीही सहन केली. मात्र त्याचा अभ्यासात अडसर येऊ नये म्हणून त्यांनी त्यांची शेतजमीनही विकली. 2018 मध्ये अमरीश यांची पत्नी दीपिका हिची लेखापाल पदी निवड झाली. त्यानंतर काही महिन्यांनी ती त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. नंतर तिने पतीवर छळ केल्याचा आरोप करत घटस्फोटाची केस दाखल केली. कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणावर सुनावणी करताना पत्नीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा निराधार ठरवून फेटाळला.

पती अमरीश यांच्या सांगण्यानुसार त्यांनी संसार वाचवण्यासाठी व एकत्र राहण्यासाठी दीपिकाकडे अनेक वेळा विनंती केली, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर तिने त्यांना आठ वर्षांच्या मुलीलाही भेटू दिले नाही. मात्र दीपिका हिच्या सांगण्यानुसार कहाणी काही वेगळीच आहे. दीपिकाचं म्हणणं आहे की अमरीश आणि त्याचे कुटुंबीय तिच्यावर खूप अत्याचार करायचे. घरातील कामे करून ती खाजगी शाळेत शिकवायची आणि कसंबसं घर चालवायची. पण एवढं करूनही कुटुंबातील सदस्य समाधानी नव्हते. तिचा रोज छळ व्हायचा. या सर्व गोष्टींना कंटाळून ती माहेरी निघून आली आणि तिथेच शिकून-सवरून ती लेखापाल बनली. त्या लोकांपासून सुटका व्हावी म्हणून घटस्फोट मागितला आहे, असे दीपिकाने सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.