AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण, आगामी 5 दिवसांमध्ये बदलणार का चित्र?

ज्या वातावरण बदलाची अपेक्षा हवामान विभागाला होती तो बदल आता झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली आहे.

Monsoon : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण, आगामी 5 दिवसांमध्ये बदलणार का चित्र?
आगामी 5 दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होणार असून चित्र बदलणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 20, 2022 | 4:51 PM
Share

मुंबई :  (Maharashtra) राज्यात आगामी 5 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Meteorological Department) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वत्र समप्रमाणात पाऊस होत नाहीतर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजून आगमनही झालेले नाही. तर राज्यात सरासरीच्या तुलनेत 56 टक्के कमी (Rain) पाऊस झाल्याचे वास्तव आहे. असे असताना हवामान विभागाकडून पुन्हा आशेचा किरण निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाला जे अपेक्षित वातावरण होते ते आता पश्चिम किनारपट्टीवर तयार झाले आहे. त्यामुळे आगामी 5 दिवसांमध्ये राज्यातील चित्र बदलणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरण असले तरी मुंबई, उपनगरे, ठाणे, कोक, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या सरी सुरु आहेत. त्यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

वातावरणातील बदलाने अपेक्षा वाढल्या

ज्या वातावरण बदलाची अपेक्षा हवामान विभागाला होती तो बदल आता झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून विदर्भातही पाऊस चांगला सक्रीय झाला असून येत्या 5 दिवसांमध्ये उर्वरीत महाराष्ट्र व्यापणार तर आहेच परंतु आता मान्सून बरसेल असाही दावा करण्यात आला आहे.

मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस

राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट दिल्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात सकाळी उजाडल्यापासून पावसाला सुरवात होत आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात समाधानकारक पाऊस होत आहे. मात्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर जी अवकृपा राहिलेली आहे ती देखील आगामी 5 दिवसांमध्ये दूर होईल असा विश्वास आहे.

राज्यभर ढगाळ वातावरण

राज्यात पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी ढगाळ वातावरण सर्वत्रच आहे. मराठावड्यात पावसातील अनियमितता अधिक तीव्रपणे जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आगामी 5 दिवसांमध्ये चित्र बदलले तर खरिपातील रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकरणाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या खरिपाला सध्या ब्रेक लागले आहे. लवकरच सर्वकाही सुरळीत होईल असा आशावाद बळीराजाला आहे.

Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?