VIDEO : दहावी नापास प्रिंसची कमाल, युट्यूब पाहून थेट विमानाची निर्मिती

बडोदामधील दहावी नापास झालेल्या एका मुलाने रिमोटवर उडणारे (Prince Panchal Making Airplane)  विमान तयार केले आहे. प्रिंस पांचाळ असं या 17 वर्षीय मुलाचे नाव आहे.

VIDEO : दहावी नापास प्रिंसची कमाल, युट्यूब पाहून थेट विमानाची निर्मिती

अहमदाबाद (गुजरात) : बडोदामधील दहावी नापास झालेल्या एका मुलाने रिमोटवर उडणारे (Prince Panchal Making Airplane)  विमान तयार केले आहे. प्रिंस पांचाळ असं या 17 वर्षीय मुलाचे नाव आहे. त्याने तयार केलेले विमान पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. तसेच वेगवेगळे विमानं आणि जहाजही त्याने तयार केले आहेत. विशेष म्हणजे युट्यूबच्या मदतीने त्याने ही विमानं (Prince Panchal Making Airplane) तयार केली.

प्रिंसने 35 देशी विमानं तयार केली. ही विमानं रिमोटने कंट्रोल केले जातात. जिद्द असेल, तर माणूस काहीही करु शकतो, हे प्रिंसने विमानं तयार करुन सिद्ध केलं.  या सर्व विमानांचे व्हिडीओही त्याने इंटरनेटवर अपलोड केले आहेत. प्रिंसचा स्वत:चा ‘प्रिंस पांचाळ मेकर’ या नावाने युट्यूब चॅनेलही आहे.

“सध्या मी दहावी पास करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी अभ्यास करायला बसलो, मी माझ्यावर दबाव येतो. त्यामुळे माझ्या शेजारची मुलं आणि मित्र मला ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील मुलगा म्हणून चिडवतात.”, असं प्रिंसने सांगितलं.

प्रिंसला दहावीमध्ये शिकत असताना खूप अडचणी येत होत्या. दहावीत असताना तो 6 विषयात नापास झाला होता. त्यामुळे शाळा सोडून तो घरी राहिला. घरी बसून तो कंटाळला होता. या दरम्यान त्याच्या डोक्यात विमान बनवण्याची कल्पना आली आणि त्याने विमान बनवण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला प्रिंसने विमान तयार करण्यासाठी बॅनर आणि होर्डिंग तयार करणाऱ्या फ्लेक्सचा वापर केला. तसेच त्याने विमानांवर मेक इन इंडियाही लिहिले. विमान तयार करण्यासाठी त्याला युट्यूबची मदत मिळाली. विशेष म्हणजे प्रिंस युट्यूब पाहून विमान बनवण्यास शिकला. पण विमान कसे तयार करावे याची पद्धतही त्याने ‘प्रिंस पांचाळ मेकर’ या यूट्यूब चॅनलवर शेअर केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *