YouTube साठी Video तर बहाणा, पाकड्यांच्या खर्चाने फिरायची आणि.. हेरगिरी करणाऱ्या ज्योतीची मोठी कबुली
हरियाणामध्ये हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे. ती पाकिस्तानी हँडलरसाठी माहिती गोळा करत होता, असे चौकशीदरम्यान ज्योतीने कबूल केले. त्या बदल्यात तिला परदेश दौऱ्यांदरम्यान प्रचंड पैसे आणि व्हीआयपी सुविधा मिळाल्या. तिने पाकिस्तान आणि चीनसह इतर अनेक देशांच्या भेटीबद्दल माहिती उघड केली.

भारतात राहून, इथलंच मीठ खाऊन पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप असलेल्या ज्योत मल्होत्रा या यू्ट्यूबरच्या अटकेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. हरियाणातील हिसार पोलिसांनी तिला बेडया ठोकल्या असून तिने चौकशीदरम्यान अनेक खुलासे करत हेरगिरी केल्याची कबुली दिली. तिने दिलेली माहिती ऐकून पोलीसही अवाक् झाले. हरियाणातील हिसार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या ज्योती मल्होत्राने यापूर्वी सांगितले होतं की ती एक युट्यूबर आहे आणि ती तिच्या युट्यूब चॅनेलसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी देशभर आणि परदेशात फिरते. मात्र तिचं खोटं फार काळ टिकलं नाही आणि तिने तिच्या कारनाम्यांची कबुली दिली. यूट्यूबसाठी व्हिडीो बनवणं हा तर फक्त एक बहाणा आहे, तथापि, त्याचे खोटे बोलणे फार काळ टिकले नाही आणि त्याने कबूल केले की व्हिडिओ फक्त एक निमित्त होते, आणि ती पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची असं तिने कबूल केलं.
या कामासाठी तिला भरपूर पैसे तर मिळालेच, पण पाकिस्तान आणि चीनच्या भेटींमध्ये तिला व्हीआयपी वागणूकही मिळाली. जेव्हा जेव्हा ती पाकिस्तानला जात असे तेव्हा तिला पाकिस्तान पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जात असे, असेही ज्योती मल्होत्राने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. एवढंच नव्हे तर तिला पाकिस्तानात कुठेही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य होते. एकीकडे सामान्य भारतीयांनी पाकमध्ये पाऊल ठेवताच त्यांच्यावर पाळत ठेवणे सुरू असतानाच ज्योतीला मात्र कुठेही भटकण्याचीमुभ होती. आपण पाकिस्तानमध्ये अनेक वेळा हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये भाग घेतल्याचंही ज्योतीने कबूल केलं.
पाकिस्तान आणि चीनमध्ये VIP ट्रीटमेंट
ज्योतीच्या सांगणायानुसार, जेव्हा ती चीनच्या दौऱ्यावर गेली तेव्हाही तिला व्हीआयपी वागणूक मिळाली. ज्योतीचे वडील हरियाणातील वीज महामंडळातून निवृत्त झाले आहेत. ती त्यांच्यासोबत हिसारमध्ये राहते, पण तिच्या खर्चासाठी त्यांच्याकडून पैसे घेत नाही. युट्यूबमधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही ती हात लावत नाही. तिच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला. ती नेहमी विमान किंवा ट्रेनने फर्स्ट क्लासनेच प्रवास करायची आणि फक्त महागड्या हॉटेल्समध्येच राहायची. आतापर्यंत ती तीन वेळा पाकिस्तानला, एकदा चीनला आणि अनेक वेळा काश्मीरला गेली आहे, असं ज्योतीने हिसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सांगितलं.
या देशांमध्येही केला प्रवास
एवढंच नव्हे तर तिने पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत इंडोनेशिया, थायलंड, दुबई, भूतान, बांगलादेश आणि नेपाळचा प्रवासही केला आहे. तिचा पासपोर्ट 22 ऑक्टोबर 2018 रोजी बनवण्यात आला होता आणि तो 21 ऑक्टोबर 2028 पर्यंत वैध असल्याचे तिने पोलिस चौकशीदरम्यान सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून ती तिच्या “ट्रॅव्हल विथ जो” या युट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली देशभर आणि परदेशात फिरत आहे. दिल्लीतील एका शीख गटासोबत दोनदा पाकिस्तानातील करतारपूर साहिब गुरुद्वाराला गेली होती आणि एकदा एकटीच गेली होती असेही ज्योतीने चौकशीदरम्यान उघड केलं.
लाखो फॉलोअर्स
युट्यूबर ज्योती मल्होत्राचे तिच्या युट्यूब चॅनेलवर सुमारे 3.77 लाख फॉलोअर्स आहेत. त्याचप्रमाणे, इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या देखील 1.31लाखांहून अधिक आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकली तर कळतं की ती ज्या कोणत्याही देशात जायची, तिथल्या खास ठिकाणांशी, खाद्यपदार्थांशी आणि संस्कृतीशी संबंधित व्हिडिओ बनवायची आणि ते तिच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करायची. यामुळे, तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्ह्यूज मिळतात.
