नवतपस्विनी : यशाचा षटकार ठोकणारी क्रिकेटपटू पूनम राऊत

नवरात्र हा सर्जनशीलतेचा उत्सव. स्त्रीशक्तीचा जागर मांडण्याची याहून दुसरी उत्तम वेळ नाही. सुरुवातीपासूनच महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. नवरात्रीच्या निमित्ताने 'टीव्ही9 मराठी'च्या वेबसाईटवर दररोज भेटुया क्रीडा क्षेत्रातील मराठमोळ्या कर्तबगार तपस्विनींना.

नवतपस्विनी : यशाचा षटकार ठोकणारी क्रिकेटपटू पूनम राऊत
Follow us
| Updated on: Sep 29, 2019 | 3:20 PM

 मुंबई : पूनम राऊत… पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या क्रिकेट या खेळातील एक चमचमतं नाव. क्रिकेट हा धर्म मानल्या जाणाऱ्या भारतातच मिताली राज वगळता फार कोणा महिला क्रिकेटपटूंची नावं भारतीयांना माहित नव्हती. मात्र दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमुळे भारतीय प्रेक्षकांना महिला क्रिकेटमधील अनेक नावं परिचित झाली. त्यापैकी एक म्हणजे मराठमोळी, मुंबईकर पूनम राऊत (Punam Raut TV9 Navtapaswini).

विश्वचषकाने भारताला हुलकावणी दिली असली, तरी भारतीयांची मनं जिंकली पूनम राऊतने. पूनमच्या संथ फलंदाजी आणि बचावतंत्राचा भारतीय संघाला फायदा झाला.

सचिन तेंडुलकर हे फक्त भारतीयच नव्हे, तर जगभरातील क्रीडा रसिकांचं दैवत. पूनमसाठी तो शिरसावंद्य नसता, तरच नवल. पूनमनेही साक्षात मास्टरब्लास्टरकडून धडे गिरवले, मात्र टीव्हीवर बघून.

30 वर्षांची पूनम मुंबईतील बोरिवली भागात लहानाची मोठी झाली. सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे गल्लीत क्रिकेट खेळत तिचा श्रीगणेशा झाला. परंतु क्रिकेटची बॅट नसल्यामुळे तिच्या स्वप्नांना कधीच ब्रेक लागला नाही. कपडे धुण्याच्या धोक्याने तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. याच जिद्दीतून क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याची मनिषा निर्माण झाली.

मुलांसोबत पाच वर्ष सराव

आधी भाऊ आणि मित्रांसोबत तीन-चार ओव्हर खेळणाऱ्या पूनमने (Punam Raut TV9 Navtapaswini) समर कॅम्पमध्ये प्रवेश घेतला. ‘मुली क्रिकेट खेळतात का? आता ही मुलगी पोरांच्या सोबत पोरांसारखे कपडे घालून क्रिकेट खेळणार का?’ असे एक ना अनेक प्रश्न शेजाऱ्यांच्या मनात उभे राहिले. त्यातच शिवसेवा अकॅडमीत पाच वर्ष पूनमला मुलांसोबत क्रिकेट खेळण्यावाचून गत्यंतर नव्हतं. त्यामुळे पालकांचा पाठिंबा असला, तरी त्यांची काळजी रास्त होती.

महिला क्रिकेटची ‘धोनी’ अशी ओळख असलेल्या सारा टेलरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

अखेर तिच्या प्रशिक्षकांनी तिचा प्रवेश माटुंग्यातील महिला अकादमीत केला. आता पूनमला मुलींसोबत सराव करण्याची संधी मिळाली. पूनमचे वडील गणेश राऊत यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. आर्थिक परिस्थितीअभावी आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न आता लेक पूर्ण करणार, याचं त्यांना समाधान होतं. पूनमला चौकार-षटकार लगावताना पाहून गणेश राऊतांना आपले दिवस आठवायचे.

सिंधुदुर्गाची कन्या

पूनमने आजवर एका कसोटी सामन्यासह 28 महिला वनडे आणि 27 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. सिंधुदुर्गातील ती पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर ठरली आहे. पूनम राऊतचं मूळ गाव हे गडमठ राऊतवाडी.

इंग्लंडमधील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तिने 86 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने 219 धावांचा डोंगर उभारुनही केवळ नऊ धावांनी झालेला पराभव पूनमसह तिच्या कुटुंबीयांच्याही जिव्हारी लागला होता.

पासपोर्टअभावी स्वप्न भंगलं

15 व्या वर्षी तिची निवड आशिया कपसाठी झाली होती. चेन्नईहून गणेश राऊत यांना फोन आला. मात्र पासपोर्टअभावी तिची पाकिस्तानवारी चुकली. गणेश राऊत यांनी पासपोर्टसाठी धावपळ केली, मात्र तो येईपर्यंत टीम आधीच खेळण्यासाठी रवाना झाली होती.

विश्वविक्रमाला गवसणी

19 मार्च 2009 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पूनमने पदार्पण केलं होतं. महिला क्रिकेटमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विश्वविक्रम हा पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा यांच्या नावावर आहे. या दोघींनी मिळून विक्रमी 320 धावांचा डोंगर रचला होता. त्यांनी हा विक्रम मे 2017 मध्ये आयर्लंड विरुद्ध खेळताना केला होता. महिला क्रिकेटविश्वात पहिल्यांदाच 300 धावांची भागीदारी झाली होती. त्यात पूनमच्या 109 धावांचं योगदान होतं.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.