केरळमधील एर्नाकुलम येते एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका 30 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून तिने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या शहरांत तब्बल 13 लग्नं केल्याचा आरोप आहे.
1 / 5
विशेष म्हणजे ही महिला 14 व्या वेळी बोहल्यावर चढली होती. मात्र त्याच वेळी पोलिसांनी तिला अटक केली आहे. या महिलेचे नाव रेश्मा चंद्रशेखरन असून ती एर्नाकुलममधील कंझिरामट्टम येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे तिला एक दोन वर्षांची मुलगीदेखील आहे.
2 / 5
रेश्माला आर्यनाड येथील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ती परंदोडू वॉर्डाचे पंचायत सदस्य अनीश (35) यांच्याशी लग्न करत होती. याच वेळी पोलिसांनी तिला पकडले आहे. विशेष म्हणजे ती पुढच्या महिन्यात 15 व्या लग्नाचीही तयारी करत होती.
3 / 5
मिळाळेल्या माहितीनुसार ही रेश्मा चांगलीच हुशार आहे. तिने पदव्यूत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तिला पीएचडीही करायची होती. तिने पहिले लग्न 2014 साली पहिले लग्न केले होते. तिने आतापर्यंत अनेकांची लग्न करून फसवणूक केलेली आहे. 2022 साली तिला एक मुलगी झाली.
4 / 5
रेश्मा असं नेमकं का करायची याची माहिती पोलीस घेत आहेत. मात्र तिच्या या कारनाम्याची सध्या देशभरात चर्चा आहे.