AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : 40 एकरातील ऊसाला आग, …तर टळली असती दुर्घटना

धुळे : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी बीड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात अशा घटना समोर आल्या आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अनेक ठिकाणी वेळेत तोड झाली नाही. त्यामुळे कालावधी पूर्ण होऊनही ऊस फडातच आहे. धुळे जिल्ह्यातील जुने कोडदे शिवारातील ऊसाची वेळेत तोड झाली असती तर 40 एकरातील ऊस जळून खाक झालाच नसता. दोंडाईचा येथील जुने कोळदे येथे उसाच्या क्षेत्राला चाळीस ते पन्नास एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली मात्र, नुकसान टाळता आले नाही.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 22, 2022 | 1:06 PM
Share
40 एकरातील ऊस जळून खाक जुने कोडदे गाव शिवारातील ऊसाला अचानक सोमवारी सकाळी आग लागली. सध्या ऊस तोडणीला आला असल्याने ऊसाचे पाचरट हे वाळलेले आहे. त्यामुळे काही क्षणात आगीने 40 एकरातील ऊस कवेत घेतला. शेतकऱ्यांचे न भरुन  निघणारे नुकसान झाले आहे.

1 / 4
ऊसतोडीचा कालावधी संपला होता: लागवड केल्यापासून 12 महिन्यांनी ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. यंदा ऊस गाळपात वाढ झाली असली तरी वाढीव क्षेत्रामुळे अजूनही ऊस फडातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. वेळेत ऊसाची तोड झाली असती तर दोंडाईचा येथील जुने कोळदे शिवारात हे नुकसान झाले नसते.

2 / 4
शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ : सकाळच्या प्रहरीच आग लागल्याने काही वेळेतच शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग आटोक्याचा सर्वकश प्रयत्न केले मात्र, वारे आणि वाळलेले पाचट यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रयत्न हे निष्फळ ठरले.

3 / 4
अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी :  गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील दुर्घटना टळली मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजलेले नाही. ऊसाबरोबरच इतर शेती साहित्याचे नुकसान झाले आहे.

4 / 4
Follow Us
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात