Marathi News » Photo gallery » After the hat and rug, now the turban, see the new look of Prime Minister Narendra Modi
PHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोदींनी उत्तराखंडची ब्रह्मकमळ टोपी घातली होती आणि मणिपूरचा गमछा घातला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आज नॅशनल कॅडेट कॉर्प्सची पाहणी करताना मोदींनी पगडी परिधान केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) रॅलीची पाहणी केली. दरवर्षी 28 जानेवारीला NCC रॅलीचे आयोजन केले जाते. यावेळी पंतप्रधानांनी आज शीख पगडी घातली होती.
1 / 5
शीख पगडी परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींना (Pm modi In pagdi) एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. ही रॅली 1953 पासून दरवर्षी आयोजित केला जाते. रॅलीत 1000 NCC कॅडेट्सच्या मार्चपास्टची सलामी घेतली.
2 / 5
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोदींनी उत्तराखंडची ब्रह्मकमळ टोपी घातली होती आणि मणिपूरचा गमछा घातला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आज नॅशनल कॅडेट कॉर्प्सची पाहणी करताना मोदींनी पगडी परिधान केली होती.
3 / 5
मोदींची पगडी पंजाबशी जोडली जात आहे. मोदी ज्या राज्यात जातात तिथला वेश परिधान करून तिथल्या लोकांची मनं जिकण्याचा प्रयत्न करतात. आता पाच राज्याच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मोदी तिथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी असे वेश परिधान करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
4 / 5
या कार्यक्रमात एनसीसी कॅडेट्सना संबोधित केले. पीएम मोदींनी तरुणांना ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, त्याविरुद्ध लढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.