AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानात शिरताना एअर होस्टेस बारकाईने काय पाहतात? हसऱ्या स्वागतामागचं खरं कारण जाणून बसेल धक्का

विमानात प्रवेश करताना एअर होस्टेस केवळ स्वागत करत नाहीत, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बारकाईने निरीक्षण करतात. मद्यधुंद व्यक्ती, आजारी प्रवासी, संशयास्पद वस्तू किंवा मानवी तस्करीचे संकेत ओळखणे हा मुख्य उद्देश असतो. आपत्कालीन स्थितीत मदत करू शकणाऱ्यांचीही नोंद घेतली जाते. हे निरीक्षण संपूर्ण उड्डाण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, केवळ औपचारिकता नाही.

| Updated on: Jul 27, 2026 | 1:56 PM
Share
विमानात प्रवेश करताच एअर होस्टेस तुमचं हसतमुखाने स्वागत करतात. मात्र, हे स्वागत केवळ औपचारिकता किंवा उत्तम सेवेसाठी नसतं. त्या काही सेकंदांत केबिन क्रू प्रत्येक प्रवाशाचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करत असतो. यामागचा उद्देश एकच—संपूर्ण उड्डाण सुरक्षित ठेवणं. ( All Photos : Getty Images)

1 / 7
विमानात चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं निरीक्षण केबिन क्रू सुरक्षेच्या दृष्टीने करतो. वरिष्ठ फ्लाइट अटेंडंट आणि A Fly Guy Travels चे संस्थापक जे रॉबर्ट यांच्या मते, प्रवासी मद्यधुंद अवस्थेत आहे का, गंभीर आजारी दिसतोय का किंवा त्याच्याकडे उड्डाणादरम्यान धोका निर्माण करू शकणारं काही सामान आहे का, याची पडताळणी याच वेळी केली जाते. म्हणूनच एअर होस्टेस फक्त तुमचं स्वागत करत नाहीत, तर तुमची चाल, बोलण्याची पद्धत आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचंही निरीक्षण करतात.

2 / 7
कोणत्या गोष्टींकडे दिलं जातं विशेष लक्ष?-  बोर्डिंगदरम्यान केबिन क्रू काही महत्त्वाच्या बाबी तपासतो. प्रवासी सहज आणि सामान्यपणे चालत आहे का? त्याचा आवाज स्पष्ट आहे की अडखळतोय?  शरीरातून मद्याचा  वास येतोय का?  अनावश्यक घाम येतोय  का? प्रवासी व्यक्ती गोंधळलेली, अशक्त किंवा गंभीर आजारी वाटत आहे का?  त्याच्या हँड बॅगेजमध्ये संशयास्पद किंवा प्रतिबंधित वस्तू आहेत का?  एखाद्या प्रवाशाबाबत संशय आल्यास केबिन क्रू तात्काळ इतर सदस्यांना सतर्क करतो, जेणेकरून आवश्यक ती कारवाई वेळेत करता येऊ शकेल.

3 / 7
विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते, मद्यधुंद किंवा अस्वस्थ प्रवाशामुळे उड्डाणादरम्यान गोंधळ निर्माण झाल्यास विमानाला नियोजित मार्ग बदलून दुसऱ्या विमानतळावर उतरावं लागू शकतं. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो आणि विमान कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसतो. म्हणूनच संभाव्य अडचणी विमान उड्डाण करण्यापूर्वीच ओळखण्यावर विमान कंपन्यांचा भर असतो.

4 / 7
तसेच, आजच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आपल्या केबिन क्रूला मानवी तस्करी (Human Trafficking) ओळखण्याचं विशेष प्रशिक्षण देतात. एखादा प्रवासी दबावाखाली असल्याचं किंवा त्याचं वर्तन संशयास्पद वाटल्यास, कोणताही गोंधळ न घालता संबंधित अधिकाऱ्यांना गुप्तपणे माहिती दिली जाऊ शकते.

5 / 7
केबिन क्रू केवळ संभाव्य धोका पहात नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकणाऱ्या प्रवाशांचीही क्रू कडून नोंद ठेवली जाते. डॉक्टर, नर्स, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, लष्करी अधिकारी किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रवासी यांना गरज पडल्यास मदतीसाठी पुढे बोलावता येऊ शकतं. याच कारणामुळे Exit Row मध्ये बसणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत दरवाजा उघडून इतरांना मदत करण्याची तयारी आणि क्षमता आहे का, याबाबत विशेष विचारणा केली जाते.

6 / 7
एअर होस्टेसचं स्मितहास्य हे केवळ आदरातिथ्याचं प्रतीक नसतं. त्या काही क्षणांत त्या प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा, आरोग्य आणि वर्तन यांचं प्राथमिक मूल्यमापन करत असतात. म्हणजेच विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे पुढच्या वेळी एखादी एअर होस्टेस हसून तुमचं स्वागत करताना दिसली, तर ते फक्त "वेलकम" नसून तुमच्या आणि इतर सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे टाकलेली पहिली जागरूक नजर असते, हे समजून जा.

7 / 7
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार