AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजय देवगणचा 11 वर्षांपूर्वीचा चित्रपट ओटीटीवर होतोय तुफान ट्रेंड; आयएमडीबीवर तगडी रेटिंग

Ajay Devgn: अभिनेता अजय देवगणचा अकरा वर्षांपूर्वीचा एक चित्रपट सध्या ओटीटीवर तुफान ट्रेंड होत आहे. या चित्रपटा आयएमडीबीवरही उत्तम रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट कोणता ते जाणून घ्या..

| Updated on: Oct 01, 2026 | 3:12 PM
Share
अजय देवगणच्या बहुचर्चित ‘दृश्यम 3’ची रिलीज अवघ्या काही तासांवर आली असताना त्याच्या एका जुन्या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ सध्या OTT वर ट्रेंडिंगमध्ये आहे. तब्बल 11 वर्षांपूर्वी आलेल्या या सस्पेन्स थ्रिलरची क्रेझ आजही कायम असल्याचे यामुळे दिसून येत आहे.

1 / 6
चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची पटकथा आणि शेवटपर्यंत टिकून राहणारं गूढ. प्रेक्षकांना सुरुवातीपासून अनेक प्रश्न पडत राहतात आणि प्रत्येक प्रसंगानंतर कथेला नवा ट्विस्ट मिळतो. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली असली तरी तो पुन्हा पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही त्याची पकड जाणवते.

2 / 6
‘दृश्यम’ हा चित्रपट निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरते. मात्र, एका अनपेक्षित घटनेनंतर हे कुटुंब कायदेशीर अडचणीत सापडतं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी विजय साळगावकर कोणकोणत्या युक्त्या करतो, याभोवती चित्रपटाचा सस्पेन्स उभा राहतो.

3 / 6
‘दृश्यम’ सध्या Amazon Prime Video वर ट्रेंडिंगमध्ये आहे. या चित्रपटाला IMDb वर 8.2/10 रेटिंग मिळालं आहे. त्यामुळे ‘दृश्यम 3’च्या आधी पहिल्या भागाची कथा पुन्हा एकदा आठवून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहत आहेत.

4 / 6
‘दृश्यम’नंतर 2022 मध्ये ‘दृश्यम 2’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांमध्ये विजय साळगावकरच्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवत रहस्य आणि कायद्याच्या संघर्षाची कथा पुढे नेण्यात आली. आता या फ्रँचायझीचा तिसरा भाग 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.

5 / 6
अजय देवगण पुन्हा विजयच्या भूमिकेत दिसणार असून तब्बूसह श्रिया सरन आणि इशिता दत्तासुद्धा यात आहेत. ‘दृश्यम 3’ हा फ्रँचायझीचा अंतिम भाग असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे नवीन चित्रपट पाहण्यापूर्वी पहिल्या दोन भागांची कथा पुन्हा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

6 / 6
Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य

पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...