1/5

दिवाळीनंतर ओढ असते ती भाऊबीजेची. कोरोनाचं संकट असतानाही काल देशभरात मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी करण्यात आली. आपल्या लाडक्या मराठमोळ्या कलाकारांनी भाऊबीज दणक्यात साजरी केली. भाऊबीजे निमित्त महाराष्ट्राच्या लाडक्या शिव ठाकरेचं त्याच्या बहिणीनं औक्षण केलं.
2/5

अभिनेत्री सई ताम्हणकरने सुद्धा तिच्या भावाचं औक्षण केलं. भाऊबीजे निमित्त तिनं भावासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
3/5

अभिनेत्री अंकिता लोखंडेनंसुद्धा भाऊबीजेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4/5

सोनाली कुलकर्णीनंसुद्धा तिच्या भावासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
5/5

'तुझ्यात जीव रंगला फेम' अभिनेत्री धनश्री काडगावकरनं देखील भाऊबीज साजरी केली आहे.