IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅपसाठी चुरशीची लढाई, ‘या’ बॉलरला फायदा

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : पर्पल कॅपसाठी गोलंदाजांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. टॉप 5 मध्ये तर मोठी चुरस आहे. पाहा पर्पल कॅप कुणाकडे आहे?

IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅपसाठी चुरशीची लढाई, 'या' बॉलरला फायदा
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 12:38 AM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने तब्बल 1 महिन्यानंतर दुसरा विजय मिळवला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 41 वा सामना पार पडला. या सामन्यात सनराजयर्ज हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमेनसामने होते. या सामन्यात आरसीबीने हैदराबादला विजयसााठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या विजयी धावांचा पाठलाग करतान हैदराबादची ढेपाळत सुरुवात झाली. आरसीबीच्या गोलंदाजांनी हैदराबादला झटके दिले. आरसीबीने दिलेल्या झटक्यातून हैदराबादला सावरता आलं नाही. परिणामी हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 171 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीने अशाप्रकारे हा सामना 35 धावांनी जिंकला. आरसीबी या हंगामात हैदराबादला त्यांच्या होम ग्राउंडमध्ये पराभूत करणारी पहिलीच टीम ठरली. या विजयानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये कोण आहे? हे जाणून घेऊयात.

पर्पल कॅपसाठी गोलंदाजांमध्ये चांगलीच चुरस आणि चढाओढ सुरु आहे. आपण पर्पल कॅप होल्डरसह टॉप 5 मधील गोलंदाजांबाबत जाणून घेतोय. या पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये रस्सीखेच आहे. पहिल्या 3 गोलंदाजांच्या नावावर आणि त्यानतंर चौथ्या आणि पाचव्या स्थानी असलेल्या दोघांच्या नावावर सारखेच विकेट्स आहे. मात्र इकॉनॉमी रेटच्या आधारावर या गोलंदाजांचं स्थान निश्चित करण्यात आलं आहे. तसेच या गोलंदाजांचे विकेट्स सारखेच असल्याने फक्त 1 विकेटने चढउतार होणार आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यानंतर या पर्पल कॅपच्या शर्यतीत अदलाबदल झालेली पाहायला मिळू शकते.

टॉप 5 मध्ये कोण?

पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल हे तिघे विराजमान आहेत. या दोघांनी प्रत्येकी 8 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र या दोघांच्या तुलनेत जसप्रीत बुमराह याचा इकॉनॉमी रेट सरस आहे. त्यामुळे बुमराहकडे पर्पल कॅप आहे. बुमराहचा इकॉनॉमी रेट हा 6.37 इतका आहे. एक बॉलर एका ओव्हरमध्ये किती धावा देतो त्या सरासरीला इकॉनॉमी रेट म्हणतात. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या चहल आणि पटेल या दोघांचा इकॉनॉमी रेट हा 8.83 आणि 9.58 असा आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानी कुलदीप यादव आणि टी नटराजन आहेत. या दोघांच्या नावावर 6 सामन्यात 12 विकेट्स आहेत. मात्र कुलदीपचा इकॉनॉमी नटराजनपेक्षा चांगला आहे. त्यामुळे कुलदीप चौथ्या स्थानी आहे. कुलदीपचा इकॉनॉमी 7.62 इतका आहे तर नटराजनचा इकॉनॉमी 8.70 असा आहे. नटराजनने आरसीबी विरुद्ध 2 विकेट्स थेट पाचव्या स्थानी झेप घेतली.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.