PHOTO | ‘आश्रम 2’च्या यशाचे जंगी सेलिब्रेशन, केक कापत आनंदोत्सव साजरा!

प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेबसीरीजचा दुसरा भागही प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. यानंतर, प्रेक्षक आता आतुरतेने तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:30 PM, 28 Nov 2020
प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेबसीरीजचा दुसरा भागही प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. यानंतर, प्रेक्षक आता आतुरतेने तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, प्रकाश झा यांनी 'आश्रम'च्या या यशाचा आनंद साजरा केला आहे. या सेलिब्रेशनमध्ये 'आश्रम'च्या संपूर्ण टीमचा समावेश होता.
प्रकाश झा यांनी सोशल मीडियावर या सेलिब्रेशनची छायाचित्रेही शेअर केली आहेत, ज्यात प्रत्येकजण केक कापताना दिसत आहे.
हे फोटो पोस्ट करताना प्रकाश झा यांनी लिहिले की, 'आश्रम' या टीमला खूप प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. 900 मिलिअन व्हुव्ज आणि आणखी मोजणी चालू आहे.
‘आश्रम चॅप्टर 2’ची कथा काशीपूरवाल्या निराला बाबा च्या गुन्ह्यांभोवती फिरली आहे. या पर्वात ढोंगी बाबाच्या आश्रमात सुरू असलेले गैरव्यवहार तपशीलवार दाखवण्यात आले आहेत.
काशीपुरवाल्या निराला बाबांची ही कथा आणखी पुढे सरकणार आहे. आता या मालिकेचा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.