New Look : अर्जुन रामपालचं मेकओव्हर, ‘धाकड’ चित्रपटासाठी केला ब्लॉन्ड हेअरलूक

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचा नवा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. (Arjun Rampal's makeover for the movie 'Dhakad')

Jun 18, 2021 | 6:10 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 18, 2021 | 6:10 PM

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने आपल्या लूकचे असे काहीतरी केले, जे पाहून त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. त्याने आपला लूक अशा प्रकारे बदलला आहे की, तो ओळखू देखील येत नाहीय!

1 / 6
सध्या इंटरनेटवर त्याच्या या लूकची खूप चर्चा सुरु आहे. अर्जुन रामपालने आपल्या केसांचा रंग बदलून प्लॅटिनम ब्लाँड केले आहेत. अर्जुन रामपालच्या या बदललेल्या लूकमुळे चाहते त्याला ओळखू देखील शकलेले नाहीत.

2 / 6
अर्जुन रामपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे, तो पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत कुणी त्याला दुर्बल झाल्याचे म्हटले आहे तर, कुणी हा व्हिडीओ पाहून तू म्हातारा दिसत आहेत, असे म्हटले आहे.

3 / 6
तर त्यचे काही चाहते त्याला हॉलिवूड स्टार म्हणूनही संबोधत आहे. अर्जुन रामपालचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेता अर्जुन रामपालचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकता की, अर्जुन रामपाल प्लॅटिनम ब्लाँड केसांमध्ये खूपच वेगळा दिसत आहे, ज्यामुळे त्याची ओळख पटवणे देखील कठीण झाले आहे.

4 / 6
त्याला ही स्टाईल सेलिब्रेटी केशभूषाकार अलीम हकीम यांनी तयार केली आहे, कारण हा व्हिडीओ त्याच्याच सलूनच्या बाहेरील आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन या सलूनमधून बाहेर पडताना दिसला आहे.

5 / 6
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेता अर्जुन रामपाल ‘नेल पॉलिश’ चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर तो लवकरच कंगना रनौतच्या ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें