Hema Malini Net Worth : आलिशान गाड्यांची आवड, कोट्यवधी संपत्तीच्या मालकीण आहेत हेमा मालिनी!

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर हेमा मालिनी आता राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या सध्या मथुरेच्या खासदार आहेत.

1/6
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर हेमा मालिनी आता राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या सध्या मथुरेच्या खासदार आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्वतःचे हक्काचे स्थान मिळवले होते. आज (16 ऑक्टोबर) त्या आपला 72वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत...

2/6
हेमा मालिनी यांनी सन 1968 मध्ये ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. त्यांनी राज कपूरसोबत आपल्या पहिल्या चित्रपटात काम केले. हेमा मालिनी राजकुमार राव याच्या सोबत ‘शिमला मिर्च’ या चित्रपटात शेवट दिसल्या होत्या.

3/6
Celebritynetworth.com च्या अहवालानुसार, हेमा मालिनी सुमारे 440 कोटींच्या मालमत्तेच्या मालक आहेत. हेमा मालिनी मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एका बंगल्यात राहतात. त्यांनी 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

4/6
अहवालांवर विश्वास ठेवला तर, हेमा मालिनी यांना महागड्या वाहनांची खूप आवड आहे. Cartoq.com मध्ये दिलेल्या अहवालानुसार, हेमा मालिनी यांच्याकडे मर्सिडीज-बेंझ, एमएल क्लास, ऑडी क्यू 5, ह्युंदाई या गाड्यांची मालकी आहे. एवढेच नाही, तर हेमा मालिनी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या अध्यक्षाही आहेत.

5/6
हेमा मालिनीला ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. या दोघेही त्यांच्या आईप्रमाणे शास्त्रीय नृत्यात पारंगत आहेत. हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही मुली स्टेज परफॉर्मन्सही देतात. त्यांची कामगिरी चांगलीच पसंत केली जाते.

6/6
हेमा मालिनी यांच्या बॉलिवूड कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘बागबान’, ‘अंदाज’, ‘राजा जानी’, ‘पैसा’, ‘अलीबाबा आणि 40 चोर’, ‘जॉनी मेरा नाम’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI