मुंबईतील बोरिवली परिसरात एका रेस्क्यू रुग्णवाहिकेचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं. Motherland रुग्णालयाकडून ही रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे.
ही रुग्णवाहिका अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज आहे. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाप्रमाणे ICU चीही सुविधा देण्यात आली आहे.
मुंबईत अनेकदा कोरोना रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही अशा तक्रारी येतात. त्या व्यक्तींना ही रुग्णवाहिका रेस्क्यू करेल आणि वेळेत त्यांना रुग्णालयात पोहोचवले.
इतकंच नाही तर एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासही ही रुग्णवाहिका मदत करेल