AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीक मागावी लागेल.. आई-वडिलांना वाटलं माझं आयुष्य संपलं ! ट्रान्सजेंडर अभिनेत्रीने उलगडला संघर्ष

अभिनेत्री एला डी वर्माने तिच्या ट्रान्सजेंडर प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. देवपासून एला बनलेल्या तिच्या ओळखीचा प्रवास, कुटुंबाकडून मिळालेली स्वीकृती आणि समाजाच्या गैरसमजांशी लढा यावर तिने भाष्य केलं.

| Updated on: Aug 29, 2026 | 6:28 PM
Share
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री एला डी वर्मा हिने तिच्या ट्रान्सजेंडर प्रवासाबद्दल आणि या काळात आलेल्या अडचणींबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.  एक मुलगा म्हणून एलाचा जन्म झाला आणि त्याचं नाव देव होतं. मात्र, लहानपणापासूनच स्वतःमध्ये मुलीची ओळख जाणवत होती.( All Photos : Social Media)

1 / 7
कुटुंब आणि समाजाच्या प्रखर विरोधाचा सामना करत अखेर एलाने स्वतःची ओळख स्वीकारली. जेंडर-अफर्मिंग सर्जरीनंतर ती देव न राहता एला डी वर्मा बनली. सिद्धार्थ कन्ननसोबतच्या मुलाखतीत तिने ट्रान्सजेंडर म्हणून जगताना आलेले अनुभव आणि समाजाकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल सांगितलं.

2 / 7
सामान्य मुलीप्रमाणे माझ्या शरीरातही अनेक बदल झाले. माझा आवाज बदलला, माझं वजन बदललं. पण या बदलांमुळे माझी किंमत कमी किंवा जास्त कशी होऊ शकते? असा सवाल तिने उपस्थित केला.

3 / 7
सोशल मीडियावर येण्यामागचा उद्देश सांगताना ती म्हणाली की, मी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी इंटरनेटवर येते. पुढे स्वतःच्या दिसण्याबद्दल बोलताना तिने सांगितलं की, दाढी असतानाही मी हसू शकले असते,  मात्र तसं दिसणं मला आवडत नाही, असं ती स्पष्टपणे म्हणाली.

4 / 7
एलाने ट्रान्सजेंडर समुदायाच्या सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केलं. “ माझं नशीब (चांगलं) म्हणून मला रेड लाइटवर उभं राहून भीक मागण्याची वेळ आली नाही.”  तुला हिजडा आणि किन्नर समुदायापासून स्वतःला वेगळं वाटतं का, असा प्रश्न विचारण्यात आला.  “मला त्यांच्यापेक्षा वेगळं वाटत नाही” असं स्पष्ट, सडेतोड उत्तर तिने यावेळी दिलं.

5 / 7
पालकांना सत्य सांगितल्यानंतर त्यांच्या मनात जी भीती होती, त्याबद्दलही एला मनमोकळेपणाने बोलली. ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे माझ्या पालकांना सुरुवातीला भीती वाटली होती. हिजडा समुदायातील व्यक्तींना समजात अनेकदा भीक मागणं किंवा शरीरविक्री या कामाशी जोडलं जातं, त्या नजरने पाहिलं जातं, त्यामुळे आपल्या मुलाचं आयुष्यही उद्ध्वस्त होईल, अशी त्यांची भीती होती, असं एला म्हणाली.

6 / 7
मात्र, काळानुसार एलाच्या पालकांनी तिला समजून घेतलं. त्यांनी आपल्या मुलीची ओळख स्वीकारली आणि तिला स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. आज एला डी वर्माने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली असून तिला कुटुंब आणि चाहते दोघांकडूनही भरभरून प्रेम मिळतं.

7 / 7
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ